प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची पर्वणी, ‘झपाटलेला ३’ लवकरच सर्वांच्या भेटीला

दोन चित्रपटानंतर झपाटलेला चा ३रा भाग येत असल्याची मोठी घोषणा आदिनाथ आणि महेश कोठारे यांनी केली आहे. 'झपाटलेला' आणि 'झपाटलेला २' चे दिग्दर्शन करणारे महेश कोठारे यांनीच 'झपाट्लेला ३' चे देखील दिग्दर्शन केलेले आहे.

प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची पर्वणी, ‘झपाटलेला ३’ लवकरच सर्वांच्या भेटीला

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेला चित्रपट म्हणजे ‘झपाटलेला’. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या कलाकारीनं लोकांना वेड केलं होत. लक्ष्याचा ‘झपाटलेला’ म्हणजे एव्हरग्रीन चित्रपट. अजूनही लोक तो आनंदाने पाहतात. यानंतर महेश कोठारे यांनी आदिनाथ कोठारे आणि सोनाली कुलकर्णी यांचा ‘झपाटलेला २’ ही प्रदर्शित केलेला होता. त्यालाही लोकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. आणि या दोन चित्रपटानंतर ‘झपाटलेला’ चा ३ रा भाग येत असल्याची मोठी घोषणा आदिनाथ आणि महेश कोठारे यांनी केली आहे. ‘झपाटलेला’ आणि ‘झपाटलेला २’ चे दिग्दर्शन करणारे महेश कोठारे यांनीच ‘झपाट्लेला ३’ चे देखील दिग्दर्शन केलेले आहे. रजनीश खनूजा (सिलेक्ट मिडिया होल्डिंग्स) आणि महेश कोठारे (जेनमा फिल्म्स इंटरनॅशनल) यांच्या संयुक्त टीमकडून हा चित्रपट निर्माण करण्यात येणार आहे.

‘झपाटलेला ३’ मध्ये सुप्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याचबरोबर रसिक प्रेक्षकांचा आवडता तात्या विंचू हा नवीन ताकदीने सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. या दोघांसमवेत आणखी एक नवीन पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झपाटलेला ३’ चा प्रवास हा आणखीनच मनोरंजक असणार आहे. या चित्रपटाविषयी  ‘झपाटलेला १’ व २ या दोन्ही चित्रपटांस भरघोस प्रेम प्रेक्षकांनी दिले आहे. या दोन हिट चित्रपटानंतर त्याच ताकदीने आम्ही पुढील चित्रपट देण्यास आम्ही सज्ज आहोत. ‘झपाटलेला ३’ चे कथा-कथन जमून आले असून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी धम्माल असणार आहे.

‘झपाटलेला ३’ चे निर्माते रजनीश खनूजा म्हणाले या चित्रपटाने निर्माण केलेलं वैष्णव आणि चित्रपटातील प्रत्येक माणसाशी जोडले जाण्याचा मला खूप आनंद आहे. ‘झपाटलेला ३’ म्हणजे प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची पर्वणी आहे. जगभरातील प्रेक्षकांसमोर हा चित्रपट आणण्यासाठी आम्ही आतूर झाले आहोत.

हे ही वाचा:

अब कि बार Sunetra Pawar, Baramati मधून Eknath Shinde यांची घोषणा

LOKSABHA ELECTION चा पहिला टप्पा, ‘इतके’ नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version