लालबागच्या राजाचा मंडप सजला , दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

लालबाग राजा (Lalbaugcha Raja) हा मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांपैकी एक आहे. या मंडळाची स्थापना १९३४ साली झाली.

लालबागच्या राजाचा मंडप सजला , दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

लालबाग राजा (Lalbaugcha Raja) हा मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांपैकी एक आहे. या मंडळाची स्थापना १९३४ साली झाली. आज राज्यभरात सगळीकडे मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. कोळी समाजामुळे या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो. लालबाग नगरीत गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सकाळी पाच वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावायला सुरुवात केली आहे. यावर्षी लालबाग नगरीत नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्यभिषेक सोहळ्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. पुढच्या वर्षी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला पुढील वर्षी ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. यंदाच्या वर्षी लालबाग गणपती मंडळाचे ९० वे वर्ष आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात ‘लालबागच्या राजा’ची ख्याती आहे. नवसाला पावणार गणपती म्हणून लालबागच्या राजाला ओळखले जाते. भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत आहेत.
गणपती बापाच्या येण्याने संपूर्ण लालबाग नागरी सजली आहे. सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईतील लालबाग हे जुने मंडळ आहे. दरवर्षी विक्रमी संख्येने भाविक दर्शनासाठी पोहोचत असतात. बाप्पाच भव्य रुप डोळ्यात साठवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.सध्या लालबाग नगरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक जण लालबागच्या राजाच्या चरणी अनेक जण नवस फेडण्यासाठी येत असतात. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी भाविक एवढ्या गर्दीत रांग लावून दर्शनासाठी जातात. या गणपतीला पहिल्याच दिवशीपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
लालबागच्या राजाच्या मंडपात मोठी गजबज आहे. कालपासून भांविकानी दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. करीरोड, लोअर परेल रेल्वे स्थानकात सकाळपासूनच लगबग आहे. भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत.
Exit mobile version