घरच्या घरी बनवा ”पोहा” पापड

घरच्या घरी बनवा ”पोहा” पापड

बहुतेक लोकांना जेवणात पापड लागतोच. खिचडीभात, डाळभात सोबत लोणचं किंवा पापड खातो. बऱ्याचवेळा पापडच आवडीने खातात. पापड हे विविध प्रकारे बनवले जातात. उडीद डाळ, तांदूळ, रव्याचे इत्यादी पापड तयार केले जातात. कामाच्या गडबडीत पापड नेहमी विकतच आणले जातात. पण जर कमी वेळात पापड तयार करायचे असेल तर पोहा पापड  हे बेस्ट ऑपशन आहे. पोह्याचे पापड तयार करायला कमी वेळ लागतो आणि लवकर बनवून  तयार होतात.

साहित्य – पोहे मीठ पाणी

कृती –

सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुऊन घ्या. स्वच्छ पोहे धुतल्यानंतर पोहे थोडावेळ भिजत ठेवा. नंतर मिक्सरच्या भांड्यात पोहे टाका आणि पाणी टाकून बारीक गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्या. एका  भांड्यात पाणी टाकून ते भांड गॅसवर मंद आचेवर ठेवा. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि तयार केलेली पोह्यांची पेस्ट टाकून सतत ढवळत राहा.  मिश्रण चांगले थंड झाल्यानंतर त्याला प्लस्टिकच्या पिशवीवर चमचाने गोलाकार करून घ्या. आणि उन्हात सुकव्याला ठेवा. पापड चांगले सुकल्यानंतर डब्यामध्ये चांगले बंद करून ठेवा. हे पापड तुम्ही वर्षभर खाऊ शकता.

 

हे ही वाचा:

कसा होता Hardik Pandya च्या नेतृत्वाखाली खेळण्याचा अनुभव, Rohit Sharma ने स्पष्टच सांगितले… उन्हाळ्यात आंब्यापासून बनवा ‘हे’ पदार्थ, अगदी कमी वेळात स्वादिष्ट पदार्थ. Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Exit mobile version