आजचे राशिभविष्य, २५ मे २०२३, आपल्या पत्नीच्या कामात…

मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर,

आजचे राशिभविष्य, २५ मे २०२३, आपल्या पत्नीच्या कामात…

माझी रास

मेष राशी –
मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर, अश्या लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात.

वृषभ राशी –
आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीतकमी हस्तक्षेप करा, अन्यथा परावलंबित्व येऊ शकते.

मिथुन राशी –
मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. कामाच्या जागी आपण स्वत:ला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते.

कर्क राशी –
तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या विषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण, धन यासाठीच साठवले जाते की, ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल.

सिंह राशी –
तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील.

कन्या राशी –
आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.

तूळ राशी –
कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते.

वृश्चिक राशी –
आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे.

धनु राशी –
शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस.

मकर राशी –
आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील.

कुंभ राशी –
मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे.

मीन राशी –
इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. – तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा.

पं केतन पाठक गुरुजी
माऊली ज्योतीष कार्यालय
९८९२४१३८६०

Exit mobile version