वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ

मागील आठवड्यात टोमॅटो ची भरपूर आवक झाली होती. शहराबाहेरील भाज्यांची आवक एकदम मंद गतीने होत आहे. तसेच स्थानिक भाजीपालादेखील कमी प्रमाणात येत आहे. यामुळे दर दुप्पट झाले आहेत.

वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ

दिवसेंदिवस तापमानाचे प्रमाण अधिक होत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेची झळ सर्वसामान्यांना देखील बसत आहे. राज्यात ढगाळ वातावरण निवळल्याने अक्षरश: आता कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फळे आणि भाजीपाल्यांना देखील फटका बसत आहे. मुंबईकरांना उष्णतेसह आता महागाईचा देखील सामना करावा लागणार आहे. शेतकरी फळे आणि भाजीपाल्यांची लागवड करुन ठेवतात. पण सध्या तापमानाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्यांवर उष्णतेचे संकट घोंघावत आहे. 

 

वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. परिणामी, बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच वधारले आहेत.त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे.वाढत्या तापमानाचा सर्वात जास्त परिणाम डाळी आणि भाज्यांवर होत असून दर नियंत्रणात नाही आणि येत्या काही दिवसांत दर अजून वाढण्यााची शक्यता आहे. वांग्यासह इतरही भाज्यांचे दर किरकोळ बाजारात ४० ते ५० रूपये प्रतिकिलोवर पोहोचल्या आहेत.

शहरात भाजी बाजारपेठेत गावखेड्यातून भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मिरची, कोथिंबीर, फुलकोबी, पालक, मेथी यासारखी भाजी जिल्ह्यातच तयार होते. यामुळे भाजीबाजार बाहेरील आवकवर फार अवलंबून नाही. पण आता ही आवकच घटल्याने दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात टोमॅटो ची भरपूर आवक झाली होती. शहराबाहेरील भाज्यांची आवक एकदम मंद गतीने होत आहे. तसेच स्थानिक भाजीपालादेखील कमी प्रमाणात येत आहे. यामुळे दर दुप्पट झाले आहेत.

कोथिंबीरच्या मोठ्या जुडीला २५ ते ३० रुपयांना, तर मेथीच्या मोठ्या जुडीला २५ रुपये दर मिळाला. तसेच शेपूच्या मोठ्या जुडीला ३५ ते ४० रुपये दर मिळाला. बाजार समितीत पालेभाज्यांसह शिमला मिरची, भेंडी, गवार, गिलके, दोडका या भाज्यांचेही दर ४० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. सध्या तोंडलीची 20 रुपये किलो दराने विक्री होत आहे. गेल्या महिन्यामध्ये किलोमागे तोंडलीचे भाव हे 40 रुपये होते मात्र आता दरात घसरण झाल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. 

हे ही वाचा:

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

‘यांचं’ स्वतःच कर्तृत्व काहीच नाही, Girish Mahajan यांची MVA वर जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version