राज ठाकरे पु्न्हा भाजपच्या मंचावर; मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी ठाकरेंची सभा

पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे उभे आहेत. त्यामुळे विद्येचे माहेरघरअसलेल्या  पुण्यात चांगलीच लढत होणार आहे.

राज ठाकरे पु्न्हा भाजपच्या मंचावर; मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी ठाकरेंची सभा

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील (Loksabha election )मतदान ७ मे रोजी पार पडले. बारामती(baramati) रत्नागिरी-सिंधुदुर्ग (ratnagiri-sindhudurg), रायगड(raigad)अशा एकूण ११ मतदारसंघाचा त्यात समावेश होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे(Narayan rane ) यांच्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी नारायण राणेंनी “येत्या ७ तारखेच्या आत राज ठाकरे सिंधुदुर्गात येतील अशी अपेक्षा करतो”खंत व्यक्त केल्याने राज ठाकरेंची तोफ ४ मे रोजी कणकवलीत धकडली. मात्र त्यानंतर राज ठाकरे (raj thackeray) पुन्हा एकदा भाजपच्या मंचावर येणार आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे मुरलीधर मोहोळ (भाजप) यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे भाजपच्या मंचावर येत असून येत्या १० तारखेला पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी अलका चौकात सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा घेणार आहेत.

 

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कोतुक करत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला.राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत मनसेला रामराम केला होता. नारायण यांच्या प्रचारात त्यांनी “नरेंद्र मोदींनी काश्मीरमधून ३७० कलम रद्द केलं हे आताच्या सरकारमुळे झालं हे मान्य करावचं लागेल”. तर अडीच अडीच वर्षांच बिगाड होत. जर भाजपने मान्य केलं असतं तर त्यांनी आज हे बोलले असते का? आपण का विरोध करतो हे माहित नाही परंतु विरोध आहे.”प्रकल्प आले की त्यांचा खासदार जाऊन विरोध करणार. प्रकल्पाचं नवीन जन्म घालायचं असेल तर त्यांचा “बारसू “घालावा लागतो. साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होतं तेव्हा उद्योग धंदे का बाहेर गेले?” अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली.

मात्र,आता पुण्यात येऊन राज ठाकरे नेमकं काय बोलणार? यााकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे उभे आहेत. त्यामुळे विद्येचे माहेरघरअसलेल्या  पुण्यात चांगलीच लढत होणार आहे.

Exit mobile version