४०० खासदारांमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगलेचे दोन खासदार असावेत – CM Eknath Shinde

४०० खासदारांमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगलेचे दोन खासदार असावेत – CM Eknath Shinde
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अनुक्रमे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट जनसभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ४०० खासदारांमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगलेचे दोन खासदार असावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरकरांना केले.
कोल्हापूरशी माझा संबंध हा फक्त निवडणुकीपुरता नाही तर महापूराच्या काळात आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकली तेव्हाही मदतीला धावून जाणारा हा एकनाथ शिंदे होता. कोल्हापूरातील महापूरावेळी एक गर्भवती महिला अडकली होती. त्यावेळी आपण कार्यकर्त्यांसह स्वतः घटनास्थळी जाऊन गर्भवती महिलेची सुटका केली तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलो. कोल्हापुरातल्या या अस्मानी संकटात सतत १२ दिवस लोकांना मदत केल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधून जनतेला संबोधित केले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य कोल्हापूरकर नागरिक उपस्थित होते.
लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अनुक्रमे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बाजूला ठेवत उबाठा परिवार पंजाला मतदान करणार आहे. राज्याचे हे मोठे दुर्दैव आहे. ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा ते जाहीरपणे सांगण्याचा त्यांना अभिमान वाटतोय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Exit mobile version