माधुरी दीक्षितचा लाल इश्क,मनमोहक अदानी केलं घायाळ

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि नृत्याने घायाळ करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही तिच्या निखळ सौंदर्यांने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

माधुरी दीक्षितचा लाल इश्क,मनमोहक अदानी केलं घायाळ

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि नृत्याने घायाळ करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही तिच्या निखळ सौंदर्यांने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

वयाच्या ५६ व्या वर्षी देखील माधुरीने तिचे सौंदर्य जपलं आहे.आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावते.
माधुरीने ९० च्या दशकापासून आतापर्यंत आपल्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा उमटवल्या आहेत.माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते,ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
तर नुकतचं माधुरीने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहेत.या फोटोत माधुरीचे लाल रंगाच्या ड्रेसमधील तिचे सौंदर्य खुलून दिसत आहेत.
माधुरीने लाल रंगाचा क्रॉप टॉप,लाल रंगाचा स्कर्ट आणि लाल रंगाचा लॉग श्रग परिधान केला आहे.
माधुरीने हा संपुर्ण लुक पुर्ण करण्यासाठी केस मोकळे ठेवले आहे,तर गळ्यात सुंदर नेकलेस आणि कानात मोठे कानातले घालुन चेहऱ्यावर गॉगलही लावला आहे.
माधुरीने फक्त तिच्या लूकनेच नाही तर तिच्या पोझने देखील चाहत्यांना घायाळ केले आहे.माधुरीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
माधुरी दीक्षित सध्या ‘डान्स दिवाने’ हा रिएलिटी शो जर्ज करत आहे.

 

Exit mobile version