मनी लौडरिंग प्रकरणी सुजित पाटकरांची ईडी कडून तीन तास चौकशी

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित मनी लौडरिंग प्रकरणी सुजित पाटकर यांचे नाव जोडले गेले होते.

मनी लौडरिंग प्रकरणी सुजित पाटकरांची ईडी कडून तीन तास चौकशी

सुजित पाटकरांची ईडी कडून तीन तास चौकशी

मुंबई-टीम टाईम महाराष्ट्र : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित मनी लौडरिंग प्रकरणी सुजित पाटकर यांचे नाव जोडले गेले होते. आज सुजित पाटकर यांची ईडीकडून तीन तास चौकशी करण्यात आली. संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी ईडीने छापा टाकला आणि याआधी चौकशी देखील झाली होती. पाटकर यांच्या व्यतिरिक्त काही लोकांना ईडी कार्याला चौकशीसाठी बोलावले आहे. अलिबाग मधील जप्त केलेली जमीन आणि इतर व्यवहारात संबंधित किडी कडून सुजित पाटकर यांची चौकशी करण्यात आली.

सुजित पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करून मुंबईतील कोविड सेंटर मध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कचराट मिळवले होते दहिसर वरळी महालक्ष्मी रेस कोर्स आणि मुलुंड येथील कोविड केंद्रावर सुजित पाटकर यांच्या कंपनीद्वारे डॉक्टर पुरवले जायचे या माध्यमातून मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे भाजप नेते किरीट सोमा यांनी म्हटले होते. ह्या घोटाळा प्रकरणी सुचित पाठ कर आणि संजय राऊत हे भागीदार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

  हेही वाचा : 

लोणावळ्यात दोन वर्षाचा चिमुकल्याचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू

यापूर्वी ईडीने संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना अटक केली होती गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एमएमआरडीए मध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली मनी लौडरिंग गुन्हा दाखल केल्यानंतर राऊत त्यांना अटक करण्यात आले होते. प्रवीण राऊत यांच्यावर 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळाचा आरोप होता ईडीच्या पथकाने प्रवीण राऊत यांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली होती.

सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला

Exit mobile version