POLITICS: MNS अध्यक्षांनी घेतली CM SHINDE यांची भेट

ही कारवाई थातूर-मातूर असल्याचा आरोप मनसैनिकांचा आहे. त्यामुळे मनसेकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

POLITICS: MNS अध्यक्षांनी घेतली CM SHINDE यांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांनी शनिवारी म्हणजेच ०२ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांची भेट घेतली. ही भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा (VARSHA) या निवासस्थानी घेण्यात आली. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे आमदार राजू पाटील (RAJU PATIL) हे यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येण्याची दोन कारणे समोर आली आहेत. एक म्हणजे दुकानांवरील मराठी पाट्या. सर्वोच्च न्यायालयाने दुकानावरील मराठी पाट्यांसंदर्भात घेतलेल्या (Marathi Patya) निर्णयानंतर अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली.

राज ठाकरे यांच्या भेटीचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टोल (Toll). ऑक्टोबर महिन्यामध्ये (OCTOBER MONTH) राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोल मुद्द्यावरून (Toll) भेट घेतली होती. मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्ससंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबतही बैठक पार पडली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना काही आश्वासने दिली होती. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दुकानांवरील ठळक अक्षरातील मराठी पाट्या हा मुद्दा सध्या राज्यभरात तापलेला आहे. यासंदर्भात अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. प्रशासनाकडून मुख्यत: मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, ही कारवाई थातूर-मातूर असल्याचा आरोप मनसैनिकांचा आहे. त्यामुळे मनसेकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटीची माहिती दिली आहे.

काय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विट (CM EKNATH SHINDE’S TWEET):

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली. या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते.

हे ही वाचा:

LIFESTYLE: थंडीत आवळ्याचे सेवन करा, आणि सुदृढ राहा

Virat Kohli चा हा T20 रेकॉर्ड तोडणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version