AAMIR KHAN ही झाला डिपफेकचा शिकार, पोलिसांकडे घेतली धाव

बॉलीवूड चा नावाजलेला हिरो आमिर खान यानेही नुकतीच पोलिसांकडे धाव घेतली आहे. सोशल मीडिया वरती सध्या आमिर खान चा एक व्हिडीओ वायरल होताना दिसत आहे

AAMIR KHAN ही झाला डिपफेकचा शिकार, पोलिसांकडे घेतली धाव

एआयच्या जगात कधी काय होईल ते सांगता येत नाही. एआय जितकं सोयीस्कर तितकंच खतरनाक देखील आहे. मागे एकदा रश्मीका मंदानाचा देखील फेक व्हिडीओ वायरल झाला होता, त्यानंतर अनेकांबाबत असे झाले. आता आमिर खानचा देखील नंबर लागला आहे. बॉलीवूडचा नावाजलेला हिरो आमिर खान यानेही नुकतीच पोलिसांकडे धाव घेतली आहे. सोशल मीडियावर सध्या आमिर खानचा एक व्हिडीओ वायरल होताना दिसत आहे, ज्यात आमिर खान एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करताना त्यांनाच मत देण्याचे आवाहन देखील करत आहे.

याबाबतीत, आमिर खानने अधिकृत निवेदन जारी करत त्याच्या टीमने पुढे येऊन त्याने मागील ३५ वर्षात देखील कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केला नसल्याचे सांगितले. मागील अनेक निवडणुकांमध्ये आमिरने निवडणूक आयोगाच्या वतीने जनजागृती केली आहे. तसेच नुकताच वायरल झालेला आणि विशिष्ट पक्षाला मतदान करायला सांगणारा आमिरचा व्हिडीओ फेक असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ खोटा असून पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे त्याने सांगितले.

वायरल झालेल्या व्हिडीओबाबत आमिरने संबंधित अधिकाऱ्यांकडे, यंत्रणांकडे तसेच मुंबई पोलीस व त्यांच्या सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. तरी आपण कुठल्याही पक्षाचा प्रचार करत नसलो तरी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा व मतदान करून लोकशाहीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्याने केलं. नुकताच आमिर खान व किरण राव यांचा दिग्दर्शन असलेला ‘लुप्त लेडीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले. तसेच आमिर ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात तो पाहुणा कलाकार म्हणून झळकला होता. तसेच, येत्या काळात त्याचा ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात तो झळकणार आहे.

हे ही वाचा:

चारशे पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे दोनशेचे वांदे, Congress प्रवक्ते Atul Londhe यांचा BJP वर हल्लबोल

दुसऱ्यादिवशी ‘Galaxy’ ची भीती कमी? सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील ‘ते’ दोन आरोपी अटकेत
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version