प्रसिद्ध गायिका Shreya Ghoshal कमावते तरी किती?

प्रसिद्ध गायिका Shreya Ghoshal कमावते तरी किती?

श्रेया घोषाल ही भारतीय गायिका आहे. श्रेयाने मेलडी क्वीन’ (MELODY QUEEN) अशी ओळख निर्माण केली आहे. श्रेयाचा जन्म १२ मार्च १९८४ रोजी बंगाली कुटुंबात झाला. श्रेया चार वर्षांची असल्यापासून तिने गाणी गायला सुरुवात केली. तिने बॉलीवूड, मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी भाषेतून गाणी गायिली आहेत. श्रेयाने ‘सा रे ग म प’ या रिऍलिटी शो मधून करिअर केले. २००२ मध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या देवदास या हिंदी चित्रपटातून गाणी गायला सुरुवात केली. या गाण्यासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेअर असे पुरस्कार मिळाले. श्रेयाने रिॲलिटी शो मध्ये जज म्हणून काम केले आहे.

श्रेयाने हिंदीमध्ये हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. तिचे भारतातच नवे तर परदेशातही चाहते आहेत. चित्रपटांबरोबर ती लाईव्ह शो पण करत असते. श्रेया एक गाण्याचे २५ लाख रुपये मानधन घेते. तिचं महिन्याचं उत्पन्न हे एक कोटींच्या आसपास आहे. गाण्यांबरोबर तिला गाड्यांची पण खूप आवड आहे. तिच्याकडे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू अश्या आलिशान गाड्या आहेत. या कोट्यवधीच्या गाड्यांचा ती वापर करते. तिची एकूण संपत्ती ही १८०- १८५ कोटी रुपये आहे. श्रेया आणि शिलादित्य हे चांगले मित्र होते. १० वर्षांच्या डेटिंगनंतर ५ फेब्रुवारी २०१५ रोजी शिलादित्य मुखोपाध्यायसोबत श्रेयाने लग्न केलं. श्रेया आता एका मुलाची आई आहे.

हे ही वाचा:

‘बिग हिट मीडिया’चं ‘Bride तुझी नवरी’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Salman Khan च्या घरावर गोळीबार, CM Eknath Shinde यांनी केली फोनवरून चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version