‘या’ अभिनेत्रीचा चित्रीकरणादरम्यान अपघात, शेअर केले फोटो

प्रियांका चोप्रा ने बॉलीवूड मध्ये चांगलेच नाव कमावल्यानंतर तिने हॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते परंतु नुकत्याच झालेल्या अपघातादरम्यान च्या दुखापतीने फोटो तिने सोशल मीडिया वरती शेअर केले आहेत.

‘या’ अभिनेत्रीचा चित्रीकरणादरम्यान अपघात, शेअर केले फोटो

बॉलीवूड (Bollywood) आणि हॉलिवूड (Hollywood) दोन्हीमध्ये नाव कमावलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra). प्रियांका चोप्राने बॉलीवूडमध्ये चांगलेच नाव कमावल्यानंतर तिने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु, नुकत्याच झालेल्या अपघातादरम्यानच्या दुखापती फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या प्रियांका हॉलिवूडच्या ‘हेड्स ऑफ स्टेट’ (Heads of State) चे शूटिंग करत आहे. या शूटिंग दरम्यान तिचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे.

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या कामाबद्दल, नवनवीन प्रोजेक्ट्सबद्दल ती आपल्या फॅन्सना माहिती देत असते. तिची फॅन फॉलोविंगही चांगलीच तगडी आहे. नुकतीच तिने आपल्या सोशल मीडियावरून झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली. यामध्ये तिच्या चेहऱ्याला झालेली दुखापत दिसून येत आहे. एखादा स्टंट करताना ही दुखापत झाली असावी असा अंदाज लावण्यात येत आहे. तिने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला आणि कपाळावर रक्त आल्याचे दिसून येत आहे. पण ही दुखापत जास्त गंभीर नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

‘हेड्स ऑफ स्टेट’ हा एक ऍक्शन मुव्ही असून यामध्ये प्रियांकाने अनेक खतरनाक स्टंट्स केले आहेत. अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘सिटाडेल’ मुव्हीमधील ८० टक्के स्टंट्स हे तिने केले असल्याचे तिने दिलेल्या DNA च्या मुलाखतीमध्ये कबुल केले होते. प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये चांगलीच रममाण झाली असून अलीकडे ‘जी ले जरा’ या फरहान अख्तर दिग्दर्शित चित्रपटामध्ये ती दिसणार असल्याची बातमी समोर येत आहेत. या चित्रपटामध्ये तिच्यासमवेत आलिया भट्ट आणि कतरीना कैफ ही असतील. Disney Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या ‘टायगर’ या माहितीपटाला तिने आवाज दिला आहे.

हे ही वाचा:

Abhijit Bichukle उतरणार निवडणुकीच्या रणसंग्रामात?

Elon Musk ने दिला X युजर्संना धक्का, आता युजर्सना मोजावे लागणार पैसे !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version