Tuesday, April 30, 2024

Latest Posts

Abhijit Bichukle उतरणार निवडणुकीच्या रणसंग्रामात?

बिग बॉस मराठी मधून नावारूपास आलेले आणि कवी मनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजित बिचुकले लवकरच निवडणुकीच्या मैदानात पाऊल ठेवणार असल्याचं समोर आले आहे.

बिग बॉस मराठी मधून नावारूपास आलेले आणि कवी मनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजित बिचुकले लवकरच निवडणुकीच्या मैदानात पाऊल ठेवणार असल्याचं समोर आले आहे. सातारा निवडणूक संघातून निवडणूक लढवणार असल्याचे अभिजित यांनी सांगितले, तरी त्यांनी या वेळी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अभिजित बिचुकले यांनी निवडणुकीची घोषणा केली. घोषणा करताना त्यांनी खासदार म्हणून निवडून आल्यावर ते कुठली कुठली कामे पार पाडतील यावर स्पष्टीकरण दिले. २००४, २००९, २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत त्यांना चांगला पाठिंबा मिळाला व यावेळी देखील ते निवडणुकीत पदार्पण करीत असून मतदार राजा जागृत झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. दोन रुपयाची दारू पाजून, मटण देऊन शक्तीच प्रदर्शन केलं जात नाही असा टोलाही बिचूकलेंनी राजकारण्यांस लगावला.

उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला त्यांनी स्वत:चे आत्मपरीक्षण करावे, असे अभिजित यांनी सांगितले. येत्या १९ एप्रिल रोजी सातारा मतदार संघातून आपल्या उमेदवारीचा अर्ज बिचुकले दाखल करणार आहेत. तसेच लोकांनी जर त्यांना निवडून दिले तर ते समुद्रातील शिव छत्रपतींच्या स्मारकाचा पाठपुरावा ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बिचूकलेंनी साताऱ्यातील भाजपचे लोकसभा उमेदवार उदयनराजे यांच्यावर टीका केली. टीका करताना ते म्हणाले,’उदयनदादांची भाजपच्या लोकसभा तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा होती, जी पूर्ण पण झाली पण त्याच भाजपने उदयनराजे यांना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे.’

मतदारांना आवाहन करताना बिचुकलेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनाला द्या, असे सांगितले. समुद्रातील छत्रपतींचे स्मारक होण्याबाबत ते पाठपुरावा करणार असून ५ वर्षांपूर्वी नरेंद मोदी यांच्याकडून भूमिपूजन झालेल्या स्मारकाची एकही वीट रचली न गेल्याची टीका त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून मा‍झ्या मागे राहा, असे आवाहन बिचूकलेंनी मतदारांना केले. मी या निवडणुकीत एकटा असून लोकांनी माझ्या पाठीशी उभा राहावे, असे बिचुकले यांनी सांगितले. 

हे ही वाचा:

Ram Navami 2024 in Ayodhya : राम मंदिरात पाठवला ‘इतक्या’ किलोंचा लाडू कुठे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर कुठे पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय? Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss