आजारपणानंतर Sheyasचे Comeback, नवा चित्रपट घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आजारपणानंतर Sheyasचे Comeback, नवा चित्रपट घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कलाकार स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता असाच एका अभिनेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आहे. सध्या श्रेयसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये श्रेयसने त्याच्या आगामी चित्रपट ”कर्तम भुक्तम” बद्दल (Kartam Bhuktam) चाहत्यांना प्रश्न विचारले आहेत. ‘कर्तम भुक्तम’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोहम शाह यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट १७ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे, विजय राज, मधू आणि अक्षय परसदानी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा पोस्टर पण रिलीज करण्यात आला आहे. ‘कर्तम भुक्तम’ हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम या भाषेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर पण मनोरंजक दिसत आहे. श्रेयसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने प्रश्न विचारले आहेत. ग्रह, तारे, तिथी, वेळ, कुंडली बघून ट्रेलर लाँच केला पाहिजे का? की तुमच्या प्रेमापोटी जेव्हा पण ट्रेलर तयार होईल तेव्हा प्रदर्शित केला पाहिजे? असा प्रश्न त्याने या व्हिडिओमध्ये विचारला आहे. जिथे प्रेम आणि विश्वास आहे तिथे प्रत्येक वेळ ही शुभ वेळ असते, असे देखील श्रेयसने म्हटले आहे. .

श्रेयसने मराठी चित्रपटांबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये पण काम केले आहे. झी मराठीवरील ”माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेत श्रेयस मुख्य भूमिकेत होता. फराह खानच्या भव्य पुनर्जन्म मेलोड्रामा ‘ओम शांती ओम’ (२००७) मधील शाहरुख खानचा मित्र पप्पू मास्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले. नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटात अल्लू अर्जुनसाठी डब केले.

हे ही वाचा:

”या” उन्हाळयात बनवा घरच्या घरी आईस्क्रीम

”या” कारणांमुळे अमृता शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version