Saturday, May 18, 2024

Latest Posts

”या” उन्हाळयात बनवा घरच्या घरी आईस्क्रीम

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. उन्हाळ्यात गरम आणि मसालेदार खायला कंटाळा येतो. त्यामुळे उन्हाळ्यात  थंड पदार्थ खावेसे वाटते. गर्मीमध्ये आईस्क्रीम, फळाचे रस, कोल्डड्रिंक इत्यादी पेयांचे सेवन केले जाते. लहानमुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वानाच आईसक्रीम खायला खूप आवडते. आईसक्रीम खाल्यावर मन आणि शरीर थंड राहते. आईस्क्रीममध्ये भरपूर प्रकार असतात. बाजरातले आईस्क्रीम खाल्यावर घसा दुखी, ताप, खोकला इत्यादी सारखे आजार होतात. त्यामुळे घरातच आईस्क्रीम बनवणे सोप्पे  आहे. चला तर मग जाणून घेऊयात रेसिपी .

साहित्य –

दूध
ब्रेड
साखर
क्रीम
व्हॅनिला ऐसीन्स
ड्रायफ्रुटस

कृती –

सर्वप्रथम भांडे गॅसवर ठेवा. त्यामध्ये दूध टाकून चांगले उकळवून घ्या. दूध चांगले उकळ्यानंतर त्यामध्ये २ ते ३ ब्रेडचे स्लाइस टाका. ब्रेडचे स्लाइस टाकल्यानंतर आवडीनुसार साखर टाका. दूध घट्ट होईपर्यंत चांगले उकळवून घ्या. नंतर गॅस बंद करा. दूध थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक पेस्ट करून घ्या. तयार केलेल्या पेस्टमध्ये क्रीम आणि व्हॅनिला ऐसीन्स घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. एका डब्यामध्ये सर्व क्रीम काढून फ्रीजरमध्ये चांगले सेट होण्यसाठी ठेवून द्या. आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटस टाकू शकता. अश्या प्रकारे तयार आहे घरगुती थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम.

 

हे ही वाचा:

उन्हाळ्यात आंब्यापासून बनवा ‘हे’ पदार्थ, अगदी कमी वेळात स्वादिष्ट पदार्थ.

उन्हाळ्यात आपल्या बागेतील झाडांची अशी घ्या काळजी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss