सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला

आता दर शनिवार आणि रविवारी रात्री साडे नऊ वाजता सुरांची ही खास मैफिल कलर्स मराठीवर सजणार आहे.

सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला

सूर नवा ध्यास नवा - पर्व गाण्याचे लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : महाराष्ट्रातील सूरवीरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा ‘सूर नवा ध्यास नवा’चा (Sur Nava Dhyas Nava) रंगमंच सज्ज झाला आहे. कलर्स मराठी वाहिनीवर गाण्यांची मैफल पुन्हा सजणार आहे. मराठी संगीत रिॲलिटी शो “सूर नवा ध्यास नवा “- पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे हे पाचवे पर्व घेऊन येत आहे. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा पार करत सुमारे पाच हजार स्पर्धकांनी या मंचावरून आपलं सुरांचं नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं. त्यातून विविध चाचणी फेऱ्यांची कसोटी पार करत सुरेल १६ स्पर्धक आपल्या सुरांचा कस लावण्यासाठी आता सज्ज झाले आहेत.

हेही वाचा 

लाल साडीत मौनी रॉयचा किलर लूक पाहून चाहते थक्क

आता दर शनिवार आणि रविवारी रात्री साडे नऊ वाजता सुरांची ही खास मैफिल कलर्स मराठीवर सजणार आहे. सूर नवा ध्यास नवा -पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे ग्रँड प्रिमियर मध्ये येत्या रविवारी २४ जुलैला सायं ७ वा. कलर्स मराठीवर. “सूर नवा ध्यास नवा “या स्पर्धेने आपले वेगळेपण जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे रॅाकस्टार गायक आणि लाडके संगीतकार अवधूत गुप्ते तसेच शास्त्रीय संगीत नव्या पिढीत रूजवण्याचा आणि ते जगभर पसरवण्याचा ध्यास घेतलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक महेश काळे हे पुन्हा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आहेत. त्याचबरोबर यंदा ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवेदनशील गुणी अभिनेत्री आणि कवी मनाची आपली लाडकी स्पृहा जोशी करणार आहे.

हेही वाचा

राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप, “मला न्याय द्या”म्हणत पीडित महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्राच्या मातीतून अनेक दर्जेदार गायक आजवर आपल्याला मिळाले, ज्यांनी सादर केलेली गाणी आजवर आपल्या स्मरणात आहेत. त्याच संगीताला पुन्हाएकदा ऐकण्याची सुवर्णसंधी आपल्याला सूर नवा ध्यास नवाच्या मंचाद्वारे मिळणार आहे. सूर नवा ध्यास नवाच्या नव्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. मराठी वाहिनीवर असं प्रथमच घडणार कि, सूरवीर फक्त मराठी गाणीच सादर करणार आहेत. मागील आठवड्यामध्ये सिटी ऑडिशनचे भाग प्रसारित झाल्यानंतर या गोड गळ्यांच्या सूरवीरांमधून कुणाची निवड होणार याचे वेध आता प्रेक्षकांना लागले आहेत. मेगा ऑडिशनमधून याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा -पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे ग्रँड प्रिमियर मध्ये येत्या रविवारी २४ जुलैला सायं ७ वा. कलर्स मराठीवर.

 

Exit mobile version