Monday, May 20, 2024

Latest Posts

राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप, “मला न्याय द्या”म्हणत पीडित महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने आता थेट

मुंबई – टीम टाईम महाराष्ट्र : शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने आता थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून मला न्याय द्या अशी याचना केली आहे. “माझी विनंती ऐकली नाही आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही तर आपल्यासमोर आयुष्य संपवण्याशिवाय कोणताही पर्याय उडणार नाही” असं या महिलेने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार करत, मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला. लग्नाचे आमिष दाखवून शेवाळे यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे पीडित महिलेने सांगितले. शेवाळे यांचे लग्न झाले असल्याची कल्पना होती मात्र, शेवाळे यांची पत्नी सोबत वाद सुरू असल्याने त्यांच्यासोबत लवकरच घटस्फोट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावर आपण विश्वास ठेवला असेही या महिलेने तक्रारीत म्हटले. याबाबत मी सोशल मीडियावरती ट्विट प्रसिद्ध केले असून, राहुल शेवाळे तिच्या वाढदिवसाला उपस्थित असल्याचा एक व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे.

या प्रकरणाची कुठलीही तक्रार अद्यापही आमच्याकडे आलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली तसेच महिलेचे ट्विटर अकाउंट अधिकृत आहेत का याची खात्रीही केली जात आहे. दरम्यान,काही दिवसांपूर्वी शेवाळी यांनी न्यायालयाकडे तक्रारीच्या आधारावर साकीनाका पोलीस ठाण्यात महिलेविरोधात खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

‘अग्निपथ’ योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Posts

Don't Miss