Mahashivratri चा शुभ मुहूर्त माहित आहे का ? जाणून घ्या सविस्तर

महाशिवरात्री ८ मार्च २०२४ रोजी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी भगवान भोलेनाथ आणि माता गौरीची पूजा करतो आणि खऱ्या मनाने उपवास करतो.

Mahashivratri चा शुभ मुहूर्त माहित आहे का ? जाणून घ्या सविस्तर

Mahashivratri 2024 : महाशिवरात्री ८ मार्च २०२४ रोजी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी भगवान भोलेनाथ आणि माता गौरीची पूजा करतो आणि खऱ्या मनाने उपवास करतो. त्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या संपतात. पती-पत्नीचे नाते घट्ट राहते. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. त्याचबरोबर अविवाहित मुलीही योग्य वर मिळण्यासाठी या दिवशी उपवास करतात. महाशिवरात्रीला जलाभिषेक आणि रुद्राभिषेकचे विशेष महत्त्व आहे.

महाशिवरात्रीला जलाभिषेक शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी ८ मार्च २०२४ रोजी रात्री ०९.५७ पासून सुरू होईल आणि ९ मार्च २०२४ रोजी रात्री ०६.१७ पर्यंत चालू राहील.

निशिता काल मुहूर्त – ८ मार्च २०२४, रात्री उशिरा १०.०७ – रात्री १२.५५

महाशिवरात्रीला या गोष्टींनी करा पूजा

गंगाजल, शुद्ध पाणी, दूध, पंचामृत यांनी शिवाचा जलाभिषेक केला जातो.

जलाभिषेकानंतर शिवलिंगावर शमीची पाने, अत्तर, साखर, गंगाजल, उसाचा रस, सुपारी, लवंग, वेलची, फळे आणि शिवाची आवडती फुले (कणेर, हरसिंगार, धातुर फुले, आक इ.) अर्पण करा.

Exit mobile version