Tuesday, May 21, 2024

Latest Posts

‘लंकेना दमदाटी केली तर…’ सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा

चौथ्या टप्प्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे पाटील अशी लढत होणार आहे.

आज चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या ताफा थंडावल्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सर्वपक्षीयांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले.अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)यांची १० मे रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार निलेश लंके(Nilesh lanke) यांच्या मतदारसंघात महायुतीची जाहीर सभा होती. त्या सभेदरम्यान अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके(Nilesh lanke) यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

अजित पवार म्हणाले होते की, “तु ज्या शाळेत शिकला आहेस त्या शाळेचा हेडमास्तर होतो.माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है. माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन की सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल”,असं म्हणत अजित पवारांनी(Ajit pawar) नगरचे  शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना इशारा दिला.

त्यावर आज बारामती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे(Supriya sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना चोक उत्तर देत म्हणाल्या की, “ह्यांच्या दमदाटीला कोणीही घाबरत नाही. सुसंस्कृत महाराष्ट्रात दमदाटी चालणार नाही.आम्ही खपवून घेणार नाही.” अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी(supriya sule)उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit pawar)प्रत्युत्तर दिलं.

पुढे त्या म्हणाल्या,”जे निलेश लंकेवर दमदाटी करत आहेत त्यांना मला विनम्रपणे सांगायचं आहे की, दमदाटी तुमच्या घरात चालवा, बाहेर नका चालवू.हे ज्यांना घाबरतात ना त्यांच्यासमोर डंके की चोट पे मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषण करतो.लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी(supriya sule) अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

दरम्यान, चौथ्या टप्प्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे पाटील अशी लढत होणार आहे.

हे ही वाचा:

VBA ला मतदान करून मत वाया घालू नका, Dr. Kalyan Kale यांचे मतदारांना आवाहन

ज्यांच्यावर टीका त्यांनाच ऑफर देण्याची Narendra Modi यांच्यावर नामुष्की, Nana Patole यांचे टीकास्त्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss