Ashadhi Wari 2023 : विठू माउलींच्या कानात मासोळ्या का असतात?

खरं तर विठ्ठलाच्या कानी मासे नसून ती माशांच्या आकाराची कवचकुंडले आहेत.एका विठ्ठलभक्ताच्या भक्तीवर भाळून विठ्ठलाने माशांना त्यांच्या कानात स्थान दिले होते.

Ashadhi Wari 2023 : विठू माउलींच्या कानात मासोळ्या का असतात?

आषाढी वारी (पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांची आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा असते. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती -धर्माचे लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. त्यांच्यासाठी वारी हा एक आनंदाचा सुखद सोहळा असतो. इथे कुठलाही भेदभाव नसतो. सगळ्यांना सामान वागणूक ही दिली जाते. सगळी लोक किंवा वारकरी हे एकोप्याने राहतात, जेवतात, चालतात आणि नाचतात सुद्धा.

 

 

गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा तो. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेवून, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवतात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते. विठोबा गेली २८ युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने वीट फेकाल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख ” पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.” असा करतात.

दगडी विटेवर उभी असलेली विठ्ठलाची मूर्ती तुम्ही निरखून पाहिली तर तुम्हाला विठ्ठलाच्या कानी मकर म्हणजेच मासे पाहायला मिळतील.हे मासे विठ्ठलाच्या कानी का आहेत ? तसेच या माशांना विठ्ठलाच्या कानी स्थान कसे मिळाले? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. याच उत्तर म्हणजे, खरं तर विठ्ठलाच्या कानी मासे नसून ती माशांच्या आकाराची कवचकुंडले आहेत.एका विठ्ठलभक्ताच्या भक्तीवर भाळून विठ्ठलाने माशांना त्यांच्या कानात स्थान दिले होते.

यामागील कथा अशी आहे की, एकदा एक कोळी पांडूरंगाना भेटायला उपहार द्ययला त्यांच्याकडे गेला होता. पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नव्हते, कारण की तो एक मच्छिमार आहे आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे होते आणि ते पण दोन. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय, पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांनाही.यावर विठ्ठल म्हणतात , “तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय. त्याच्याकडे काही नसूनही तो देतोय या गोष्टीकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्विकार करेल, मग ते काहीही असू दे . कारण मी ही सृष्टी चालवली असून त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी देखील आहेत.मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि कुठल्याही भेदाभेदीत पडत नाही असे सांगून विठ्ठल ते दोन मासे कानात कुंडलांप्रमाणे घालून घेतात आणि सर्वजण एका पातळीवर सामान आहेत असा संदेश देतात.

 

हे ही वाचा:

Sri Lanka विरुद्ध Pakistan कसोटी सामन्यामध्ये मिळाले २१ वर्षीय खेळाडूला स्थान

संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version