Tuesday, June 18, 2024

Latest Posts

BJP ला सत्तेत उखडून काढले तरच देशात परिवर्तन होईल: Prakash Ambedkar

नाशिक येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ आज (शनिवार, १८ मे) 'वंचित' चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पाडली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार टीका केली.

नाशिक येथे वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार करण गायकर (Karan Gaikar) यांच्या प्रचारार्थ आज (शनिवार, १८ मे) ‘वंचित’ चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची सभा पार पाडली यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींसह (PM Narendra Modi) भाजपवर जोरदार टीका केली. तसेच, आज जरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मतदान केले तरी ते मोदींनाच होणार आहे, असा टोला त्यांनी मारला.

यावेळी ते म्हणाले, “काँग्रेस चोर म्हणून भारतीय जनता पार्टीला सतेत आणलं आणि त्यांनी तेच काम केले. ईडी (ED), इन्कम टॅक्स (IT) च्या आधारे भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत काळा पैसा आला आहे. उद्या जर दोन्ही सेना एक झाल्या तर एक सेना मोदींच्या डाव्या बाजूला तर दुसरी सेना उजव्या बाजूला असणार आहे आज जरी उद्धव ठाकरे यांना मतदान केले तर मोदींना च होणार आहे वर्षभरापासून गदारी केली तेच ऐकत आहोत काही तरी दुसरं तरी नवीन सांगा, ” असा टोला त्यांनी दिला.

“दिल्लीच्या शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले तरी देखील हमी भाव मिळाला नाही त्यासाठी वंचित सत्तेत आली तर हमीभाव करणारच असे ते म्हणाले भारतीय जनाता पक्षाला सत्तेत उखडून काढले तर देशात परिवर्तन होईल. भारतीय रेल्वे ही लोकांची रेल्वे होती मात्र आता ती येणाऱ्या पाच वर्षात अदानी, अंबानी यांची झाल्या शिवाय राहणार नाही. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा १०० रुपयांची कर्ज ८४ रुपये केले आहे त्यामुळे पुढील पाच वर्षात देशाचं कर्ज १०० रुपये होणार आहे मोदींनी सरकारी कंपन्या विकायला सुरुवात केली आहे. आर्थिक कणा मजबूत असावा म्हणून जुन्या पिढीनी कंपण्या सरकारी ठेवल्या आहेत.”

“आर्थिक कणा कमकुवत असेल तर आपल्याला नांगी टाकावी लागते मोदींनी मालदीव समोर नांगी टाकली. तिथल्या एका मंत्र्याने ट्विट केलं मोदींनी त्याच्या नाड्या दाबायला सुरुवात केली. मतदारांना ठरवायचा आहे देश मोठा की मोदी मोठा? अनेक मोदी येतील जातील देश टिकला पाहिजे. काल बीकेसी ग्राउंड वर सभा झाली काल तो तमाशा झाला. कोणीच कोणाचा प्रचार करत नाही अशी परस्थिती आहे. या देशात २०१४ पासून शासनाने एक उत्तर दिले या देशाला हिंदू राष्ट्र करायचा आहे. १७ लाख हिंदू ज्यांची मालमत्ता ५० कोटींवर आहे त्यांनी देश नाही तर नागरिकत्व सोडलं. पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुलीचा कार्यालय झाले. मी व्यापाऱ्यांना सांगतो मोदीला आणले , आता तुमच्या मागे लागेल”

“राज्यात भाजपची धांदळ उडाली आहे. नरेंद्र मोदींना गल्लो गल्ली सभा घेण्याची वेळ आली आहे. जे आपल्याला दोन जागा द्यायला निघाले होते ते आता म्हणत आहेत वंचित ने आमची वाट लावली. आम्ही सांगितलं आमची कोंबडी हिसकाऊ देणार नाही आम्हीच खाऊ. मोदींची भाषा बदलायला लागली आम्ही सविधान बदलणार नाही. बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत हा मोदी खोटारडा आहे एवढं लक्षात घ्या. आम्ही घटना बदलणार आहे का विचारणार नाही. तुम्ही घटना बदलणार आहात का याचा उत्तर आम्हाला द्या. खोटं बोलायचं असेल तर आईची शपथ बापाची शपत, पोराची शपथ मी कधी शपथ खात नाही मी तेच करत आहे. नातू म्हणून मी सांगतो बाबासाहेब आमच्यातून निघून गेले आतापर्यंत असा चमत्कार झालेला नाही गेलेले माणूस परत आला. त्यांनी सामाजिक बदल केला नाही तर बाकीच्यांचे आधारासाठी लढायला सांगितली. मोदी गॅरंटी सरकार सांगतात इथे सगळ्यांनी गॅरंटी दिली आहे. येथे नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला गॅरंटी दिली. मोदींची गॅरंटी कोणी पाहिली. त्याच्या या गॅरेंटी ला काय गॅरंटी आहे. तुम्ही अग्नि समोर घेतलेली गॅरंटी पाळू शकत नाही,” असे ते म्हणाले.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss