खुसखुशीत पालक वडी आवडते? मग जाणून घ्या कृती…

खुसखुशीत पालक वडी आवडते? मग जाणून घ्या कृती…

घरात सर्वजण पालक आवडीने खात नाहीत. पालकापासून अनेक पदार्थ बनवले जातात. पालक भाजी, पालक पनीर, पालक लसूण आणि भजी इत्यादी पदार्थ बनवू शकतो. पण कधी पालक वडी बनवली आहे का? पालक हे आरोग्यासाठी चांगले असते. पालकामध्ये कॅल्शियम, सोडियम, लोह, खनिज प्रोटीन भरपूर प्रमाणात पालकामध्ये असतात. पालक वाडी बनवायला जास्त वेळ आणि साहित्य लागत नाही. चला तर जाणून घेऊयात पालक वडीची रेसिपी.

साहित्य

कृती

पालक वडी करताना पालक स्वच्छ धुऊन घ्या. पालक धुऊन झाल्यावर बारीक चिरून घ्या. बारीक चिरून झाल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची लसूण पेस्ट, लाल तिखट, ओवा, हळद, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, तीळ, मीठ सर्व जिन्नस टाकून चांगले एकत्र करून घ्या. या मिश्रणाचा गोळा करून कुकरच्या डब्यामध्ये हलक्या हाताने पसरवून घ्या. कुकरच्या ३ शिट्ट्या द्या. कुकर पूर्ण थंड करून घ्या. थंड झाल्यावर पातळ वड्या कापून घ्या. गॅसवर कढईमध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यावर वड्या सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर तळून घ्या. तयार आहे खुसखुशीत पालक वडी.  वरणभात, चपाती, भाकरीसोबत या पालकाच्या वड्या आपण सर्व्ह करू शकतो.

हे ही वाचा:

‘बिग हिट मीडिया’चं ‘Bride तुझी नवरी’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

प्रसिद्ध गायिका Shreya Ghoshal कमावते तरी किती?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version