मोदी सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, Dhananjay Mahadik यांचा दावा

मोदी सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, Dhananjay Mahadik यांचा दावा

खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दोन्ही मतदार संघ शिवसेनेकडे आहेत. शिवराज सिंह चव्हाण आले होते तेव्हा कार्यकर्त्यांनी एक लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी विनंती केली होती. आज भाजपचे खूप मोठ्या प्रमाणात बोलबाला आहे. एक जागा भाजपाला मिळावी यानुसार चर्चा झाली होती. मात्र अद्याप अजून कोणतीही माहिती आम्हाला आलेल्या नाहीत, असे महाडिक यांनी सांगितले.  सोलापूरमध्ये दोन वेळा भाजपचे खासदार निवडून आले होते. साताऱ्यामध्ये उदयनराजे निवडून आले होते. सांगलीत संजय काका दोन वेळा निवडून आले होते. शौमिका महाडिक यांना जर आदेश दिला की हातकणंगलेमध्ये लढा तर आमची तयारी असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

वंचित आघाडीची महाराष्ट्रात ताकद आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळे काही ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मात्र MVA ने त्यांना जो फॉर्मुला दिला तो त्यांना मान्य आहे असं वाटतं नाही. प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकला चलो’ चा नारा दिला आहे. महायुतीला सुद्धा त्यांनी पाठिंबा द्यावा असे प्रयत्न करायला काही हरकत नाही. मनोज जरांगे यांनी जी मागणी केली होती, ती मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे. आरक्षणसंदर्भात कार्यवाही सुरु आहे. राहुल गांधी यांची जिथे जिथे यात्रा गेली तिथे काँग्रेस फुटली आहे. मोदी सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. संविधान कोणीही बदलू शकतं नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितले आहे. मुद्दा नसल्याने विरोधक असे आरोप करत आहेत. संजय काका पाटील हे एकतर्फी निवडून येतील. महाविकास आघाडीमध्ये तिथल्या जागेवरून गोंधळ सुरू आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार निवडून येईल, असे मत माध्यमांशी बोलतांना धनंजय महाडिक यांनी मांडले.

हे ही वाचा:

मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी असणार का?

प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंची नवीन आघाडी, वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version