Monday, May 20, 2024

Latest Posts

प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंची नवीन आघाडी, वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता राजकारणाला एक नवीन ट्विस्ट आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांनी नवीन आघाडी केली आहे. काल रात्री प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आंतरवली सराटी मधून जाऊन भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर आज त्यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची नावे घोषित केली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय घेण्यात आले. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका ३० तारखेला घेतील. जरांगेंनी ३० तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आलेली पहिली उमेदवार यादी:-

भंडारा-गोंदिया : संजय केवट
गडचिरोली : हितेश पांडूरंग मडावी
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंग पवार

हे ही वाचा:

प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंची नवीन आघाडी, वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

अकोल्यातील बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची आंतरवलीमध्ये भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss