लोणावळ्यात दोन वर्षाचा चिमुकल्याचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू

नाशिक मधील पवार कुटुंब हे आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळा येथे गेले होते.

लोणावळ्यात दोन वर्षाचा चिमुकल्याचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू

लोणावळ्यात दोन वर्षाचा चिमुकल्याचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू

नाशिक-टीम टाईम महाराष्ट्र : नाशिक मधील पवार कुटुंब हे आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळा येथे गेले होते. लोणावळ्यातील एका व्हीलामध्ये वाढदिवस साजरा करण्याच्या उतरले होते. कुटुंबातील सदस्यांनी व्हीलामध्ये प्रवेश केला. चिमुकल्याचे वडील चेकइन करण्याची फॉर्मॅलिटी पूर्ण करत असताना, मुलाला स्विमिंग पूलच्या दिशेने गेला आणि खेळण्याच्या आकर्षित होऊन पाण्यात पडला आणि यात शिवबा अखिल पवार या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला. या घटनेनंतर पवार कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नाशिकचे हे पवार कुटुंब आपल्या जुळ्या मुलांचा दुसरा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने लोणावळ्याला गेले होते. यावेळी सर्वजण बुक केलेल्या व्हीलामध्ये पोहोचले आणि चेकिंग करण्याच्या प्रक्रियेत व्यस्त असताना. मुलाकडे दुर्लक्ष होऊन ही दुर्घटना घडली. रिसेप्शन जवळ असलेल्या स्विमिंग पूल कडे आकर्षित होत. शिवबा तिथे पोहोचला व पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना ही बाब लक्षात येताच त्यांनी स्विमिंग पूल कडे धाव घेतली त्याला बुडताना पाहून त्याच्या कुटुंबायांनी पुलाकडे धाव घेता शिवबा बाहेर काढले तसेच त्याला पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले परंतु डॉक्टरने त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा : 

राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप, “मला न्याय द्या”म्हणत पीडित महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Exit mobile version