अहमदनगर जिह्ल्यात पुन्हा वाढले लम्पी आजाराचे रुग्ण

राज्यात पुन्हा लम्पी (Lumpy skin Disease) आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. त्यामुळे राज्यातील पशुपालक चिंतेत पडले आहेत.

अहमदनगर जिह्ल्यात पुन्हा वाढले लम्पी आजाराचे रुग्ण

राज्यात पुन्हा लम्पी (Lumpy skin Disease) आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. त्यामुळे राज्यातील पशुपालक चिंतेत पडले आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील जनावरांना मोठ्या प्रमाणावर लम्पी (Lumpy) आजाराची लागण झाली आहे. अहमदनगर जिह्यातील ४१३ गावातील जनावरांना लम्पी या आजाराने घेरलं आहे. या जिह्ल्यात सध्या ९३० जनावरं लम्पी आजाराने बाधित आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा लम्पिबाधित म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामळे लम्पिबाधित जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

अहमदनगर जिह्ल्यात लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या अनेक महिन्यानापासून अहमदनगर जिह्यातीळ ४१३ गावातील ९३० जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे काही जनावर ही गंभीर अवस्थेत आहेत. शेगाव, पाथर्डी, राहुरी, कोपरगाव या तालुक्यातील लम्पीचे रुग्ण मोठया प्रमाणत आहेत. त्यामुळे हा जिल्हा लम्पिबाधित म्हणून घोषित करण्यात आला आहे. या आजाराने त्रस्त असलेल्या जनावरांना जिल्याबाहेरील वाहतुकीसाठी प्रशासनाणे बंदी घातली आहे.

या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्‍यांनी, पशुपालकांनी गोठे स्वच्छ करून कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागाने लसीकरण सुरु केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली आहे.पावसाळा सुरु झाल्यापासून १५ जूननंतर लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. पावसाळ्यात कीटक, चिलटे, डास यांच्यामुळे हा आजार वाढण्याची शक्यता असते.

हे ही वाचा:

जिथे ‘इंडिया’ युतीची बैठक होणार तिथे उद्धव ठाकरे गटाने लावले भगवे झेंडे, म्हणाले…

तब्बल १३ वर्षांनी मुंडे भावंडानी एकत्र येत साजरा केला रक्षाबंधन सण

तब्बल १३ वर्षांनी मुंडे भावंडानी एकत्र येत साजरा केला रक्षाबंधन सण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version