Saturday, May 18, 2024

Latest Posts

तब्बल १३ वर्षांनी मुंडे भावंडानी एकत्र येत साजरा केला रक्षाबंधन सण

रक्षाबंधन हा सण राज्यभर साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणी यांच्यासाठी हा खूप खास सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करतो असं वाचन देखील जाते.

रक्षाबंधन हा सण राज्यभर साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणी यांच्यासाठी हा खूप खास सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करतो असं वाचन देखील जाते. यंदाच्या वर्षी रक्षाबंधनसाठी तब्बल १३ वर्षांनंतर मुंडे कुटुंबीय एकत्र आले आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी १३ वर्षानंतर हा सण एकत्र साजरा केला आहे. राजकारणात एकमेकांच्या विरोधात असणारे बहीण भाऊ रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी तब्ब्ल १३ वर्षांनंतर रक्षाबंधन सण साजरा केला आहे.
२००९ नंतर मुंडे कुटुंबीयांनी एकत्र येऊन रक्षाबंधन साजरे केले आहे.
सणानिमित्त राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे तसेच प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांच्याकडून देखील राखी बांधून घेतली.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे रक्षाबंधनचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप जास्त चर्चेत आहेत.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना तिन्ही बहिणींनी राखी बांधली आहे.
राजकारणातील विरोधामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दुरावले होते पण यावर्षी त्यांनी पुन्हा एकत्र येऊन रक्षबांधन सण साजरा केला आहे.

हे ही वाचा:

वाराणसीत ‘या’ कालावधीत रंगणार ‘Sansad Khel Mahotsav’, जाणून घ्या सविस्तर

रक्षाबंधनसाठी आज तरी Ajit Pawar जाणार का सिल्वर ओकवर ?

अनेक प्रश्नांची उत्तरे ‘INDIA’ आघाडीच्या मुंबई बैठकीत मिळणार, पंतप्रधान चेहरा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss