अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

अखेर आज महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा ही संपणार आहे. आज दिनांक २५ मे रोजी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात येणार आहे.

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Maharashtra Board HSC Result 2023 : अखेर आज महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा ही संपणार आहे. आज दिनांक २५ मे रोजी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीरहोणार असून सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हा निकाल पाहता येईल.

यंदाच्या वर्षी १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. तसेच निकाल जाहीर झाल्यनानंतर दिनांक २६ मे पासून दिनांक ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –

http://Maharesult.nic.in

http://hsc.maharesult.org.in

http://hscresult.mkcl.org

ऑनलाईन निकाल कसा पाहाल? –

कसा चेक कराल आपला निकाल?

SMSद्वारे निकाल कसा पाहाल..?

पुनर्परीक्षेसाठी २९ जूनपासून अर्ज

जुलै-ऑगस्टमध्ये हाेणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी आणि श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी २९ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

अखेर प्रतीक्षा संपली!, HSC चा निकाल उद्या दुपारी २ वाजता जाहीर होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version