संविधान वाचवण्यासाठी आमची ही लढाई आहे – Amol Kirtikar

संविधान वाचवण्यासाठी आमची ही लढाई आहे – Amol Kirtikar

महाविकास आघाडीचे (Mahvikas Aghadi) मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे (Mumbai North West Constituency) उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ‘आमची लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे. जी हुकूमशाही आहे त्यांना पायउतार व्हावं लागेल.” असे वक्तव्य केले.

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) उमेदवार म्हणून अमोल कीर्तिकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्याविरुद्ध महायुतीतर्फे (Mahayuti) शिवसेना शिंदेगटाचे (Shivsena) रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना उमेदवारी देण्यात आले आहे. यावेळी बोलताना अमोल कीर्तिकर म्हणाले, “आज मी अर्ज भरत आहे. संविधान वाचवण्यासाठी आमची हि लढाई आहे. विरोधकांची बॉडी लँग्वेज बघून त्यांना लढायची आहे असं वाटतं नाही. पण लढायचं आहेच आता आम्हाला. पहिल्यांदा सावज जाळ्यात टाकायचं आणि मग हलाल करायचं हि भाजपची नीती आहे. सर्व मतदार आणि जनता हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.”

“जी हुकूमशाही आहे त्यांना पायउतार व्हावं लागेल. माझ्या समोरचं चिन्ह हे चोरलेलं धनुष्यबाण आहे. शिवसेना आजही कोणाची विचारल की, आधी बाळासाहेबांचं नाव येतं आणि नंतर उद्धव ठाकरेंचं नाव येते. ही मशाल आपण घराघरात पोहोचवणार,” असे ते यावेळी म्हणाले.

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्याने ते आपल्या मुलांविरुद्ध प्रचार करताना दिसणार आहेत. त्यामुळे, मुलगा विरुद्ध वडील असा सामना येथे पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा:

अस्वस्थ झाले असते तर ८४ वर्ष….नारायण राणेंची शरद पवारांवर टीका

संविधानाला संघ आणि मोदींपासून नाही तर विरोधकांपासून धोका, महाराष्ट्र मोदींसोबतच!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version