Mukesh Ambani यांच्या घरी झाले चिमुकल्या पाऊलांचे आगमन, Akash – Shloka ला कन्यारत्नाचा लाभ

अंबानी कुटुंबात पुन्हा एकदा चिमुकल्या पाऊलांचे आगमन हे झाले आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत.

Mukesh Ambani यांच्या घरी झाले चिमुकल्या पाऊलांचे आगमन, Akash – Shloka ला कन्यारत्नाचा लाभ

अंबानी कुटुंबात पुन्हा एकदा चिमुकल्या पाऊलांचे आगमन हे झाले आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. अर्थात उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी एका छोटाश्या परीचे आगमन हे झाले आहे. त्यांची मोठी सून श्लोका मेहता अंबानी (श्लोका मेहता) यांनी बुधवारी दिनांक ३१ मे रोजी मुलीला जन्म दिला आहे. आकाश अंबानी आणि श्लोका यांचे हे दुसरे अपत्य आहे. त्यांना पृथ्वी अंबानी नावाचा २ वर्षांचा मुलगाही आहे.

तसेच काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी आपला मुलगा आकाश आणि नातू पृथ्वी याच्यासोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आले होते. श्लोकाही पती आकाश अंबानी आणि सासरे मुकेश अंबानीसोबत बाबुलनाथ मंदिरात गेली होती. तर श्लोका ही बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली होती. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांनी मार्च 2019 मध्ये लग्न केले. श्लोका मेहता ही देशातील प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. आकाश आणि श्लोकाच्या लग्नाला अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते आणि दोघांचेही कुटुंब गुजरातचे आहे. आकाश अंबानी आणि श्लोका यांचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले आणि ते एकाच वर्गात होते. डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले.

एप्रिल महिन्यात नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या उद्घाटन समारंभात अंबानी कुटुंबाने श्लोका मेहताच्या गरोदरपणाची माहिती दिली होती. NMACC लाँचच्या दुसऱ्या दिवशी श्लोकाने तिचा बेबी बंप दाखवला. यापूर्वी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने २०२२ मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला होता. तसेच मुकेश अंबानी यांनी आपल्या तिन्ही मुलांवर आपल्या रिलायन्स इंडस्ट्रीतील महत्त्वाच्या कंपन्यांची मोठी जबाबदारी सोपवली आहे. आकाश अंबानी टेलिकॉम कंपनी जिओची जबाबदारी आहे. तर, रिटेल व्यवसायाची जबाबदारी मुलगी ईशा अंबानीच्या खांद्यावर आहे. धाकटा मुलगा अनंत अंबानी रिलायन्सच्या नवीकरणीय ऊर्जा व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहे.

हे ही वाचा : 

सरकारने संबंधित वेबसाईटवर कारवाईचे आदेश दिले असले तरी…, जयंत पाटील

लग्न कधी आहे? या प्रश्नावर Parineeti Chopra ने दिली प्रतिक्रिया…

Jejuri मध्ये देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद आणखी पेटला, ग्रामस्थ घेणार लवकरच Raj Thakrey यांची भेट!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version