ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर; कोण आहेत ठाकरेंचे १७ उमेदवार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर सर्वच पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे.

ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर; कोण आहेत ठाकरेंचे १७ उमेदवार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर सर्वच पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. भाजपने आपली पहिली उमेदवार यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली. त्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी एक्सद्वारे राज्यभरातील १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर ट्विट करत लिहिले आहे, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे,असे सांगत ठाकरे गटाची उमेदवार यादी जाहीर केली आहे. तर अजूनही ठाकरे गटातील ४ ते ५ जागांचे उमेदवार घोषित करण्यात आलेले नाही. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर शिल्लक राहिलेल्या जागांवर उमेदवार घोषित केले जाणार आहेत.

ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेली उमेदवार यादी:-

बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ – संजोग वाघेरे-पाटील
सांगली -चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
नाशिक – राजाभाई वाजे
रायगड – अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
परभणी – संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई

हे ही वाचा:

भाजपकडून स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर, मोदींसह गडकरी, फडणवीस करणार प्रचार

अकोल्यातील बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची आंतरवलीमध्ये भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version