Thursday, May 2, 2024

Latest Posts

भाजपकडून स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर, मोदींसह गडकरी, फडणवीस करणार प्रचार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर भाजपकडून स्टार प्रचारकांची (BJP Star Campaigners) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर भाजपकडून स्टार प्रचारकांची (BJP Star Campaigners) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपाकडून जोरदार तयारी केली जात आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh), बिहार (Bihar) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) साठी भाजपने ही यादी जाहीर केली आहे. जाही करण्यात आलेल्या या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi), जे.पी.नड्डा, (J P Nadda), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह अनेक नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विनोद तावडे (Vinod Tawade) या नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे हे नेते इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार या दोन राज्याच्या प्रचाराची जबाबदरी सोपवण्यात आली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती ईराणी आणि मनोज तिवारी यांचेही नाव या यादीमध्ये आहे.

बिहार राज्यामधील स्टार प्रचारक

नरेंद्र मोदी,जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, विनोद तावडे, सम्राट चौधर,विजय कुमार सिन्हा,गिरीराज सिंह,नित्यानंद राय,अश्विनीकुमार चौबे, दीपक प्रकाश,सुशील कुमार मोदी,नागेंद्रनाथ त्रिपाठी, भिखुभाई दलसानिया,संजय जयस्वाल,मंगल पांडे,रेणू देवी,प्रेम कुमार, स्मृती ईराणी,मनोज तिवारी,सय्यद शाहनवाज हुसेन,नीरज कुमार सिंह,जनक चमर,अवधेश नारायण सिंह,नवल किशोर यादव,कृष्ण नंदन पासवान, मोहन यादव,मनन कुमार मिश्रा,सुरेंद्र मेहरा,शंभू शरण पटेल,मिथिलेश तिवारी,राजेश वर्मा,धर्मशाला गुप्ता,कृष्णकुमार ऋषी, अनिल शर्मा,प्रमोदकुमार चंद्रवंशी, निवेदिता सिंह, निक्की हेम्ब्रोम

पश्चिम बंगाल राज्यातील स्टार प्रचारक

नरेंद्र मोदी,जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह,अमित शाह,योगी आदित्यनाथ, हिमंता विश्व सरमा, मानिक साहा,अर्जुन मुंडा,सुनील बन्सल,मंगल पांडे, अमित मालवीय,निसिथ प्रामाणिक, सतपाल महाराज,स्मृती ईराणी, मुख्तार अब्बास नक्वी, सुकांता मजुमदार,सुवेंदू अधिकारी,शंतनू ठाकूर, स्वप्न दासगुप्ता, दिलीप घोष,राहुल सिन्हा,मिथुन चक्रवर्ती,देबश्री चौधरी,समिक भट्टाचार्य,नागेंद्र रॉय,दिपक बर्मन,जगन्नाथ चट्टोपाध्याय,मफुजा खातून,सुशील बर्मन, सुकुमार रॉय, निखिल रंजन डे, मिहीर गोस्वामी, मालती रवा रॉय, डॉ. शंकर घोष, जोयल मुर्मू,गोपालचंद्र साहा,सद्रथ तिर्की, रुद्रनील घोष,अमिताव चक्रवर्ती, सतीश धोंड

हे ही वाचा:

IPL 2024: Mumbai Indians टीममध्ये Suryakumar Yadav असणार की नाही?

IPL 2024 : कोणत्या तारखेला कोणता सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss