Sachin Tendulkar याच्या फोटोचा आणि नावाचा ‘बनावट जाहिराती’मध्ये गैरवापर

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला आहे.

Sachin Tendulkar याच्या फोटोचा आणि नावाचा ‘बनावट जाहिराती’मध्ये गैरवापर

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन थेट पोलीस ठाण्यात पोहचला आहे. सचिनने मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर सेलमध्ये पोलीस तक्रार दाखल केली आहे. ऑनलाइन ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी त्याचे नाव, आवाज आणि फोटो बनावट जाहिरातींसाठी वापरला जात असल्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अज्ञात लोकांविरुद्ध कलम ४२६, ४६५ आणि ५०० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

तसेच ही काही पहिली वेळ नाही जेव्हा कोणीतरी सचिन तेंडुलकरच्या फोटोचा किंवा उत्पादनांच्या जाहिरातीसाठी आवाजाचा गैरवापर करून ऑनलाइन लोकांना फसवते. यापूर्वी देखील २०२० मध्ये, तेंडुलकरच्या टीमने एक निवेदन जारी केले होते. ज्यामध्ये ते त्याच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, फोटो व्यावसायिक हेतूंसाठी वापरणाऱ्या कंपन्या आणि व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करतील असे म्हटले होते. त्यानंतर, तेंडुलकरने गोव्यातील एका कॅसिनोविरुद्ध प्रचार सामग्रीमध्ये मॉर्फ केलेला फोटो वापरल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.

Exit mobile version