Monday, May 20, 2024

Latest Posts

“कल्याण लोकसभेची जागा विक्रमी मतांनी निवडून येईल”; श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

मी पुन्हा आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की, मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खारेगावमध्ये उपस्थित राहावे. महायुतीतील कार्यकर्ते, पदाधिकारी आम्ही एकत्र काम करत आहोत, आमच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद असून कार्यकर्त्यांसह जनतेचाही प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे.

देशभरात निवडणुकीचे सत्र (Loksabha Election 2024) सुरु आहे. ७मे रोजी निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला. ११ मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले. लोकसभा मतदानाच्या पाचव्या टप्प्यात ठाण्यामध्ये(Thane) मतदान होणार आहे. ठाण्यातून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) शिवसेना गटाकडून तर वैशाली दरेकर(Vaishali Darekar) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ही निवडणूक लढवणार आहेत.

काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली देखील झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचारसभा देखील होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेत १५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा देखील होणार आहे तर १२ तारखेला कल्याण लोकसभेत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची देखील जाहीर सभा होणार आहे. यावेळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला असल्याने भाजपच्या आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करताना ते दिसून येत आहेत.

राज ठाकरे(Raj thackeray) व नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेसाठी महायुतीच्या सर्वच पदाधिकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची डोंबिवलीच्या ग्लोब हॉल मध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याचबरोबर भाजपचे पदाधिकारी सह इतर मित्र पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.यावेळेस डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण व भिवंडी लोकसभेसाठी 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ठाणे जिल्ह्यात तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भिवंडीमध्ये सभा आयोजित केली आहे.

 

‘१५ तारखेला वरटेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट भिवंडी लोकसभा पंतप्रधानांची सभा होणार आहे. मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. त्याचबरोबर 12 तारखेला कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभेसाठी खारेगाव 90 फिट रोडला राज ठाकरे यांची सभा होणार असून त्याचे नियोजन झाले आहे.दोन्ही सभांसाठी हजारो लोक या सभेला उपस्थित राहणार आहेत. मी पुन्हा आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की, मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खारेगावमध्ये उपस्थित राहावे. महायुतीतील कार्यकर्ते, पदाधिकारी आम्ही एकत्र काम करत आहोत, आमच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद असून कार्यकर्त्यांसह जनतेचाही प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. तसेच कल्याण लोकसभेची जागा विक्रमी मतांनी निवडून येईल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आमच्या सभांना नागरिकांचा उस्फुर्त मिळत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे’.

हे ही वाचा:

महायुती गळ्यात गळे घालतात पायात पाय घालतात आणि…

उद्धव ठाकरेंच्या मदतीला नरेंद्र मोदी धावणार? पं. राजकुमार शर्माची भविष्यवाणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss