ललित पाटील यांच्यासह १५ जणांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ३१५० पानांची चार्जशीट दाखल

मागील काही महिन्यांपासून पुण्यातील ललित पाटील प्रकरण चर्चेत आहे.

ललित पाटील यांच्यासह १५ जणांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ३१५० पानांची चार्जशीट दाखल

मागील काही महिन्यांपासून पुण्यातील ललित पाटील प्रकरण चर्चेत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट चालवणारा ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. आता ललित पाटील यांच्यासह १५ जणांवर गुन्हे दाखल केले असून तब्बल ३१५० पानांचे चार्जशीट देखील दाखल करण्यात आले आहे. ड्रग्स रॅकेट प्रकरणात ललित पाटील यांच्यासह त्याचा भाऊ भाऊ भूषण पाटील आणि त्यांच्या इतर साथीदारांवर पुणे पोलिसांनी कोर्टात चार्जशीट दाखल केले आहे.

ड्रग्ज माफिया ललित अनिल पाटील पुण्यातील ससून रुग्णालयात आजारपणाचे खोटे कारण सांगत रुग्णालयात ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्यावेळी ससून रुग्णालयाच्या गेटवर २ कोटी १४ लाखांचं ड्रग्स सापडले होते. या सर्व प्रकरणानंतर अनेक ड्रग्ज प्रकरण समोर आली आहे. या सर्व रॅकेटमध्ये बड्या लोकांचा हात असल्याचे देखील समोर आले आहे. रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, कारागृह पोलीस, कारागृहातील डॉक्टरांसह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभाग आहे. त्यानंतर पोलिसांना बडतर्फ करण्यात आले होते. तसेच सहा जणांना निलंबित देखील करण्यात आले आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांकडून चार्जशिट दाखल करण्यात आली आहे.

पुण्यातील या ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलसह अरविंद कुमार प्रकाशचंद्र लोहरे,अमित जानकी सहा ऊर्फ सुभाष जानकी मंडल, रौफ रहीम शेख, भूषण अनिल पाटील, अभिषेक विलास बलकवडे, समाधान बाबूराव कांबळे, इमरान शेख ऊर्फ आमिर अतिक खान, हरिश्चंद्र उरवादत्त पंत, रेहान ऊर्फ गोलू आलम सुलतान मोहम्मद अन्सारी, प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे, जिशान इक्बाल शेख, शिवाजी अंबादास शिंदे, राहुल पंडित ऊर्फ रोहित कुमार चौधरी ऊर्फ अमित कुमार या सगळ्यांवर दोषपात्र पत्र दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

प्रिया आणि अस्मिताचा नवा डाव,दागिने स्वत:च गायब करुन सायलीवर घेतला चोरीचा आळ

सत्ताधाऱ्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही, निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मनोज जरांगेंनी दिला सरकारला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version