नाशिकसह इतर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला

नाशिक शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून अंगाची लाही लाही होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाचा चटका दिवसभर जाणवत असून झाडांची पाने हलत नसल्याने नाशिककर घामाघुम झाल्याचे चित्र आहे.

नाशिकसह इतर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला

नाशिक शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून अंगाची लाही लाही होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाचा चटका दिवसभर जाणवत असून झाडांची पाने हलत नसल्याने नाशिककर घामाघुम झाल्याचे चित्र आहे. नाशिक शहरात काल कमाल तापमान 40.2 अंश तर किमान तपमान 23.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. त्यामुळे दुपारी बाहेर निघणे कठीण झाले असून आरोग्य प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळी सात वाजेपासून वाऱ्याचा वेग मंदावून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. यामुळे नाशिककर घामाघूम होत आहेत. कमाल तापमान 40.2 अंश तर किमान तपमान 23.7 अंश सेल्सिअस इतके (Temprature) नोंदविले गेले. नाशिकचे कमाल तापमान दहा दिवसांपासून 32 ते 34 अंश सेल्सिअसच्या जवळपास स्थिरावत होते, तर कमाल तापमान 12 से 21 अंशांच्या आसपास असायचे. मात्र, अचानकपणे कमाल किमान तापमानाने उसळी घेतली आहे. याचा परिणाम वातावरणावर झालेला दिसून येत आहे.

दरम्यान उन्ह वाढल्याने दुपारी बारा वाजेपासून चार वाजेपर्यंत शहरासह उपनगरांमधील रस्त्यांवरील वर्दळ मंदावलेली दिसून येत आहे. नाशिककरांनी शक्यतो दुपारी घराबाहेर पडणे टाळले. पुढील पाच दिवस उन्हाचा तडाखा अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या शनिवारपर्यंत हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. किमान तापमानातही वाढ होत असल्यामुळे नागरिकांना सायंकाळी सुद्धा उकाड्याचा समान करावा लागत आहे. रात्रीची झोप घेण्यासाठी नागरिकांकडून कुलर, पंखे, वातानुकूलित यंत्राचा आधार घेतला जात आहे. वाढत्या उकाड्यामुळे नाशिककर मागील दोन दिवसांपासून हैराण झाले आहेत. उन्हाची वाढलेली तीव्रता आणि उकाड्यामुळे थंड गुणधर्माची फळे, व शीतपेय, आईस्क्रीम कुल्फीलाही मागणी वाढली आहे.

नाशिकमध्ये कोरडे हवामान जरी असले, तरी उष्ण वाऱ्यामुळे कमाल- किमान तपमानात वाढ होत आहे. याबरोबरच वातावरणात दमटपणाही जाणवत असून, नागरिकांना उकाडा असह्य होऊ लागला आहे. मागील सकाळी 70 ते 75 पर्यंत आर्द्रता नोंदविली जात होती. मात्र, मंगळवारी हे प्रमाण अचानकपणे घसरले आणि सकाळी केवळ 58 टक्के इतकी आतिची नोंद झाली. त्यामुळे दुपारी बाहेर पडणे टाळावे, उन्हात जाणे टाळावे, उपरणे, गॉगल्स वापरावेत, नागरिकांनी उन्हापासुन बचाव करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Exit mobile version