सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत; मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत.

सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत; मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. काल परळीमध्ये त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे रूपांतर सभेमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. या सभेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, बीडसह राज्यातील अनेक मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि गृहमंत्र्यांच यावर एकमत आहे का? म्हणून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे. पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक आहेत, त्यामुळे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही त्यांच्याशी भांडणार आहोत. तसेच, गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून माझ्या घरावर नोटीसा लावल्या जात आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले.

२४ तारखेच्या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. मराठा समाजाच्या वतीने सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत. पण ते चुकीच्या माणसाने भेटले असून मी समाजाला दैवत मानतो, त्यामुळे मराठा समाजाने एकजूट दाखवावी. समाजात फूट पडू नये म्हणून २४ तारखेला आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. २४ तारखेला आंतरवली सराटीमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीमध्ये मराठा समाजाची ताकद काय असते, मराठा समाजाच्या मताची ताकद काय असते, यावर निर्णय होणार आहे. तर नऊशे एकरावर सभा कुठे घ्यायची याची देखील घोषणा या बैठकीत होणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या बैठकीमध्ये परळीच्या पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बैठकीला परवानगी मिळाली. या निर्णयावरून देखील मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला. मनोज जरांगे म्हणाले, सरकारला मराठा समाजाबद्दल द्वेष आहे. त्यामुळेच बैठकींना परवानगी मिळत नाही. सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत. ना कायदा लागू होत नाही का? राजकीय नेते सभा घेतात, त्यांना परवानगी मिळते मग आम्ही सामाजिक बैठका घेऊ शकत नाहीत का? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. जरी सरकार आमच्यासोबत अन्यायाने वागत असाल तर तरी न्यायदेवता योग्य न्याय करेल, असे मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

पवार कुटुंबातील राजकीय लढाईवर सरोज पाटील यांनी दिली प्रतिक्रिया, राजकारण घरात आणलं…

Voter ID कार्ड अपडेट कसे करायचे माहित नाही , जाणून घेऊया सोप्या टिप्स | Voter Id Card | Voting Card

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version