Monday, May 20, 2024

Latest Posts

पवार कुटुंबातील राजकीय लढाईवर सरोज पाटील यांनी दिली प्रतिक्रिया, राजकारण घरात आणलं…

सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती (Baramati) मतदार संघाकडे लागले आहे.

सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती (Baramati) मतदार संघाकडे लागले आहे. बारामती हे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार(Ajit Pawar) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. काही वर्षांपासून पवार कुटुंबातील व्यक्ती उमेदवारीसाठी उभी राहिल्यानंतर सहज निवडून येत होती. मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी गट फुटल्याने कुटुंबातच राजकीय लढाई सुरु आहे. त्यामुळे जनता काकांना साथ देणार की पुतण्याला साथ देणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. त्यातच आता शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सरोज पाटील म्हणाल्या, गट फुटला म्हणून पवार कुटुंब फुटलं नाही. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जे निवडूण येतील ते येतील. आम्ही नेहमी घरी येताना राजकीय चपला बाहेर काढून येतो. एनडी पाटील आणि शरद पवार हे दोन्ही अत्यंत डावे-उजवे लोक होते. पण कधीही राजकारण घरात आणलं नाही. एनडी पाटील राजाराम बापूंविरुद्ध निवडणुकीत उभे राहिले, तेव्हा त्यांच्याकडे पैसा नव्हता. त्यावेळी माझ्या आईने प्रचारासाठी त्यांना १० हजार रुपये दिले होते. राजकारण घरात आणलं नाही. आम्ही एकाच ताटात जेवतो’, असे सरोज पाटील म्हणाल्या. शरद पवारांच स्वत:च्या ताटापेक्षा बहिणीच्या, एनडीच्या ताटात काही कमी आहे का? याकडे लक्ष असतं. या सुस्कृत कुटुंबात असं काही होणार नाही. राजकारणात एनडी पाटील शरद पवारांवर प्रखर टीका करायचे. आम्हाला ती सवय आहे. शरद पवार काँग्रेस तर आई शेकाप पक्षात होती. डाव्या विचारसरणीचे लोक यायचे. यशवंतराव चव्हाणांसारखे पुढारीपण यायचे. पण म्हणून त्याचा घरावर परिणाम झाला नाही, असे सरोज पवार म्हणाल्या.

अजित काय बोलला? श्रीनिवास काय बोलला?हे सगळं राजकरणापुरतं आहे. इलेक्शन संपलं की ढग निघून जातील. सध्या जे राजकारण सुरु आहे, बद्दल दु:ख, अत्यंत वाईट वाटत. आईने शिकवलय रडत बसायच नाही. डोळ्यात पाणी हे दुबळेपणाचा लक्षण आहे. सुवर्णकाळ आम्ही बघितलाय असं त्या म्हणाल्या. भाजपाचा सगळा रोख शरद पवारांकडे आहे. हा माणूस खल्लास केला, की राज्य आपल्याकडे असं त्यांना वाटतं, असे देखील सरोज पाटील म्हणल्या. अजित पवारांचा तोल कसा सुटला ते माहित नाही. अजित संवेदनशील आहे. कदाचित अजितला आता पश्चाताप होत असेल, असे देखील सरोज पाटील म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार कोण जिंकेल, असे विचारल्यानंतर सरोज पाटील म्हणाल्या, मी शिक्षिका आहे. माझं दोघींवर प्रेम आहे.

हे ही वाचा:

Voter ID कार्ड अपडेट कसे करायचे माहित नाही , जाणून घेऊया सोप्या टिप्स | Voter Id Card | Voting Card

चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर होणार का? उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss