मराठवाड्यात पाणी प्रश्न, जायकवाडी धरणात फक्त १५.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक

मागील वर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्यामुळे यावर्षी मराठवाड्यात पाणीप्रश्न उभा राहिलेला आहे.

मराठवाड्यात पाणी प्रश्न, जायकवाडी धरणात फक्त १५.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक

मराठवाड्याला (Marathwada) पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात (Jayakwadi dam) फक्त १५.६२ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तरी मागील वर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्यामुळे यावर्षी मराठवाड्यात पाणीप्रश्न उभा राहिलेला आहे. याचबरोबर उन्हाचा पारा वाढतच चालल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची समस्या उद्भवत आहे. पाणीप्रश्नामुळे मराठवाड्यामध्ये टँकर ने पाणीपुरवठा सरकारला करावा लावत आहे. यामुळे मराठवाड्यातील टँकर चा आकडा १ हजार ६३ वर जाऊन ठेपला आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये ४४३ एवढे टँकर सुरु आहेत. जायकवाडी धरणाची पातळी १५०१.०७ फूट व ४५७.५२६ मिटर एवढी आहे. जायकवाडी धरणामध्ये सध्याचा पाणीसाठा १५.६२ टक्के असून १.०८८ एवढे धरणाचे बाष्पीभवन आहे. उजवा कालवा विसर्ग ९०० क्युसेक तर डावा कालवा विसर्ग २००० क्युसेक इतका आहे.

मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आताच्या वेळी मराठवाड्यात जवळजवळ १ हजार ६३ टँकर नि पाणीपुरवठा करण्याचे काम चालू आहे. बऱ्याच गावांमध्ये पाण्याचा स्रोत नसल्यामुळे गावकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले असून त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मराठवाड्यातील जवजवळ ७२० गावे आणि २३७ वाडयांवर टँकर ने पाणीपुरवठा चालू आहे. यात १५ शासकीय आणि १०४८ खाजगी टँकर चा समावेश आहे.
मराठवाड्याबरोबरच महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीप्रश्न असल्यामुळे टँकर चा वापर करून पाणी प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे. यापैकी छत्रपती संभाजीनगर मध्ये ४४३ टँकर, जालन्यामध्ये ३४३, बीड मध्ये ११९, परभणी मध्ये १, नांदेड मध्ये ३, धाराशिव मध्ये ६६, लातूर मध्ये ८ टँकर चावापर केला जात आहे.तरी अजून भरपूर उन्हाळा शिल्लक असल्याने भविष्यात राज्यातील पाणीप्रश्न कसा मिटेल हा एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

हे ही वाचा:

दिव्या भारतीच्या मृत्यूचे खरे कारण, सहकलाकाराने केला खुलासा
BJP चा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’, Nana Patole यांचा घणाघात
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version