Tuesday, April 30, 2024

Latest Posts

BJP चा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’, Nana Patole यांचा घणाघात

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज (रविवार, १५ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपचा जाहीरनामा (BJP Manifesto) जाहीर केला. या जाहीरनाम्यातून नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असून महिला सक्षमीकरण, रोजगाराच्या संधी, उद्योजकता आणि शेतकरी यांच्यावर भर देण्यात आला आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करत ‘भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ असल्याचे व्यक्तव्य केले आहे.

“सत्तेत असताना १० वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपाने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले, जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी व जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले आणि पुन्हा याच घटकांना फसवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ असून जनता आता भाजपाच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही,” असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नागपुर येथे पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, “मोदी सरकारने मागील १० वर्ष फक्त अदानीसाठी काम केले, हे सरकारच अदानी सरकार होते पण जाहीरनाम्यात अदानीचा हिस्सा असायला हवा होता ते मात्र दिसत नाही. समान नागरी कायद्याचे आश्वासन तर मागील निवडणुकीतही दिले होते मग आतापर्यंत भाजपाने त्याची अंमलबजावणी का केली नाही, त्यांना कोणी रोखले होते का? वन नेशन, वन इलेक्शन म्हणजे पुन्हा निवडणुकाच घेणार नाही असे आहे. २०१४ व २०१९ मध्ये भाजपाने जे सांगितले तेच मुद्दे आजच्या जाहीरनाम्यात आहेत. जनता आता भाजपाच्या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाला घरी बसवण्याचा संकल्प जनतेने केला आहे.”

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चंद्रपूरातील सभेत खालची पातळी गाठली. आमचा उमेदवार शिलाजित खाल्लेला पैलवान आहे, असे विधान करून गडकरींनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. शिलाजित कशासाठी खातात हे नितीन गडकरींनी सांगावे. महिलांचा अपमान करणाऱ्या नितीन गडकरी यांनी माफी मागितली पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.

हे ही वाचा:

Uddhav Thackeray गद्दार, सायकिक, त्यांची Shivsena नकली, Narayan Rane यांची सडकून टीका

 

Salman Khan च्या घरावर गोळीबार, CM Eknath Shinde यांनी केली फोनवरून चर्चा

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss