UNION BUDGET2023, आज सादर झाला देशाचा अर्थसंकल्प, जाणून घ्या थोडक्यात

आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पाची चर्चा संपूर्ण देशात चालू होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यंदा पाचव्यांदा शेवटचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकारने येत्या निवडणुकांचा विचार करून तसेच अर्थव्यवस्थेची अवस्था पाहून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. तर कोणत्या गोष्टींचा लाभ सामान्य जनतेला मिळाला हे आपण पाहूया.

UNION BUDGET2023, आज सादर झाला देशाचा अर्थसंकल्प, जाणून घ्या थोडक्यात
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंडाची (Agriculture Accelerator Fund) घोषणा केली आहे. भरड धान्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार.
ग्रीन ग्रोथ हि नवी संकल्पना अर्थसंकल्पात आली आहे. जी नैसर्गिक गोष्टींच्या लागवडीस प्राधान्य देईल. तसेच निसर्गाने दिलेल्या गोष्टींचे जतन करेल.
रेल्वेसाठी २ लाख ५० हजार कोटींची निधी देण्यात आला आहे. मागील १० वर्षांपासून रेल्वेचे बरेचसे प्रकल्प रखडले होते परंतु अर्थसंकल्पाने केलेल्या तरतुदीमुळे रेल्वेच्या कामकाजासाठी मोठा निधी मिळाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा प्रवास सुखकर होणार आहे.
सरकारने इलेक्ट्रिक वस्तूंवरील कस्टम ड्युटी हटवली आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती कमी होणार आहेत. तसेच मोबाईल आणि इलेट्रीक वस्तू स्वस्त होणार.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली. येणाऱ्या काळात ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्ती सरकार करणार आहे. तसेच साडे तीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे यासाठी देण्यासाठी एकलव्य शाळांची निर्मिती केली जाणार आहे.
या वस्तू होणार स्वस्त – इलेक्ट्रीक गाड्या,खेळणी, सायकल स्वस्त होणार,मोबाईल फोनही ,कॅमेरा लेन्स ,मोबाईल फोन आणि टीव्ही
या वस्तू होणार महाग – विदेशी किचन चिमण्या महागणार,चांदीचे दागिने महाग होणार,चांदीची भांडीही महागणार,सिगारेट महागणार,सोने, चांदी, प्लॅटिनम महागणार

Exit mobile version