सर्वसामान्य माणूस या घाणेरड्या  राजकारणामुळे…Imtiyaz Jaleel काय म्हणाले?

सर्वसामान्य माणूस या घाणेरड्या  राजकारणामुळे…Imtiyaz Jaleel काय म्हणाले?

२०१९ प्रमाणे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती होणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या युतीसाठी आमची दारे आजही उघडी आहेत असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत एकत्रित येऊन नवे समीकरण तयार करावे, असे इम्तियाज जलील म्हणाले. यासोबतच, काहीतरी घडलं असेल त्यामुळे आमची युती तुटली मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत विचार करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कुणी विचार सुद्धा केला नसेल की, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे होतील.

कुणी विचार सुद्धा केला नसेल की, काका पुतणे म्हणजे शरद पवार आणि अजित पवार वेगळे होतील अशा परिस्थितीत आमच्याकडे एक चांगला पर्याय होता आणि आता सुद्धा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अजूनही विचार केला पाहिजे की, आम्ही अशा पद्धतीने एक नवे समीकरण तयार करून जास्तीत जास्त जागांवर जिंकू शकतो. माझे मन, आमचे दरवाजे आणि सर्व काही प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आज सुद्धा खुले आहे. त्यांनी एकत्र यावे, आपण मिळून काहीतरी करू असे इम्तियाज जलील म्हणाले. तसेच, सर्वसामान्य माणूस या घाणेरड्या  राजकारणामुळे वैतागला आहे. रात्री झोपताना एका पक्षात आणि सकाळी उठल्यावर दुसऱ्या पक्षात गेल्याचे समजते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकत्र आल्यास काहीतरी नवीन घडेल असे इम्तियाज जलील म्हणाले.

हे ही वाचा:

उन्हाळ्यात पाणी पिऊन कंटाळा आला असेल तर ‘हे’ उपाय नक्की करून पाहा

शिवनेरीवर अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील एकमेकांसमोर, समोर येताच अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version