Saturday, April 27, 2024

Latest Posts

उन्हाळ्यात पाणी पिऊन कंटाळा आला असेल तर ‘हे’ उपाय नक्की करून पाहा

राज्यात उन्हाळ्याच्या झळा वाढायला सुरुवात झाली आहे.

राज्यात उन्हाळ्याच्या झळा वाढायला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यापासूनच राज्यभरात ऊन जास्त प्रमाणात पडत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते.पाणी हे मानवासाठी जीवन आहे. दिवसभरात शरीराला पुरके असे पाणी पिल्याने आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात शरीराला जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळे दिवसभरात १ ते २ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. पण तुम्हाला रोज रोज पाणी पिऊन कंटाळा येतो का? अश्या वेळी तुम्ही ते पाणी अधिक चवदार बनवू शकता. पाण्यात वेगवेगळ्या फळांचे रस टाकून तुम्ही ते पाणी पिऊ शकता. पाण्यामध्ये तुम्ही काकडी किंवा लिंबू घालून तुम्ही त्याची चव अधिक जास्त वाढवू शकता.

आलं पुदिना लिंबूचे पाणी

आलं आणि पुदीना पचनासाठी चांगला असतो. त्यामुळे रोजच्या जेवणात आल्याचा वापर केला जातो. उन्हाळ्यात ब्लोटिंग आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबूचा रस आणि आल्याचे बारीक तुकडे टाकून ते पाणी तुम्ही पिऊ शकता.

सफरचंद दालचिनीचे पाणी

उन्हाळ्यात शरीर जास्त प्रमाणात थकून जाते. अश्यावेळेस काहीच काम करुस वाटत नाही. तसेच रक्तातील साखर कमी जास्त होत असते. सफरचंद दालचिनीचे पाणी तुम्ही पिऊ शकता. हे पाणी बनवण्यासाठी सोपे आहे. दालचिनी इंसुलिन संवेदनशीलता सुधारून शरीरातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करते. सफरचंद दालचिनीचे पाणी बनवण्यासाठी सफरचंद कापून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर त्यात २ ते ३ दालचिनीच्या काड्या घाला. हे सर्व एका काचेच्या मोठ्या बाउलमध्ये ठेवून त्यात तुम्हाला हवे तेवढे पाणी घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात पुदिना आणि लिंबू देखील टाकू शकता.

टेंगेरिन आणि थाईम ओतलेले पाणी

टेंगेरिनमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. थाईमचा वापर पोटातील वायू, अपचन यांसारख्या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी केला जातो. हे पाणी बनवण्यासाठी टेंगेरिन्समधून बिया काढून त्याचे पातळ तुकडे करून घ्या. नंतर एका मोठ्या भांडयात टेंजेरिनचे तुकडे आणि थाईम ठेवा आणि त्यात पाणी ओता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात बर्फ घालू शकता.

हे ही वाचा:

शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होत Amol Kolhe यांनी घेतले महाराजांचे दर्शन

निर्मला सीतारमण यांनी केला मोठा खुलासा, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss