देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनंतर घेतली एकनाथ शिंदेची भेट

राज्याच्या राजकारणात सध्या निवडणुकांचे सत्र चालू आहे. निवडणूक तोंडावर असताना अनेक पक्षांनी आपल्या आपल्या पक्षासोबत बैठकांना सुरवात केली आहे

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनंतर घेतली एकनाथ शिंदेची भेट

राज्याच्या राजकारणात सध्या निवडणुकांचे सत्र चालू आहे. निवडणूक तोंडावर असताना अनेक पक्षांनी आपल्या आपल्या पक्षासोबत बैठकांना सुरवात केली आहे. त्याचबरोबर पक्षातील बैठक घेत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याकडे देखील सरकारचे लक्ष लागले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. राज्यमंत्रिमंडळ विस्तार होणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. विषयच म्हणजे राज्य विधिमंडळाच्या विस्ताराच्या चारच उधाण आले असतानाच अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मनसे आणि इतर समविचारी पक्षांना युतीत घेण्याबाबतच चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे युतीला नवा भिडू मिळणार असल्याची चर्चा आहे.

राज्यविधिमंडळाच्या विस्तारासंबंधी चाच चालू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात काही तरी वेगळा घडणार असल्याची चिन्ह बघायला मिळत आहे. आणि त्याबाबत दक्षता देखील घेतली जात आहे. आणि अनेकांच्या भुवया देखील उंचावताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, मान्सूनपूर्व तयारी, युतीच्या आगामी सभा आणि दौरे यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच पावसाळी अधिवेशनापूर्वी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यावरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच ही चर्चा झाली. यावेळी भाजपचा एकही नेता उपस्थित नव्हता.

सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल दिल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. युतीच्या नेत्यांनीही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे नव्या विस्तारात किती जणांचा सामावेश करायचा, या विस्तारात कुणाकुणाला संधी द्यायची, कुणाला संधी नाही द्यायची आणि कुणाच्या नावावर आक्षेप आहे, यावरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच पावसाळी अधिवेशनापूर्वीच विस्तार होणार असल्याने त्यावरही या दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात महापालिका निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशावेळी युती भक्कम करण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे राज्यात आगामी काळात नवीन समीकरणे होताना पाहायला मिळणार आहेत.

हे ही वाचा:

महापुरुषांवर गरळ ओकनाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे, अजित पवार

राज ठाकरे आणि अवधूत यांच्यामधील प्रश्नावलीपर चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version