Friday, May 3, 2024

Latest Posts

राज ठाकरे आणि अवधूत यांच्यामधील प्रश्नावलीपर चर्चा

‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती.

‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. आता दुसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. अवधूत गुप्तेने राज ठाकरेंबरोबरचा फोटो सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हजेरी लावणार आहेत. ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा शो प्रसारित करण्यात येणार आहे. शोची सुरवात ही एकनाथ शिंदे पासून जरी होत असली तरी देखील त्यानंतर राज ठाकरेंनी देखील या शो मध्ये येऊन त्यांची उपस्थति दर्शविली आहे.

खुपते तिथे गुप्ते या शो मध्ये अवधूत गुप्ते हे लोकांची किंवा बड्या नेत्यांची पोल उघडण्याची भूमिका बजावताना दिसत आहे. तर येणाऱ्या पाहुण्यांना अवधूत गुप्ते यांच्या प्रश्नावलीला तर सामोरे जावेच लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या सिझन मध्ये आपण बघणारच आहोत एकनाथ शिंदे, राज ठाकरे यासारखे बडे नेते अवधूत खुपतेच्या प्रश्नावलीला कसे सामोरे जाणार आहे. आणि कशा पद्धतीने प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहात.अवधूत गुप्तेने राज यांना त्यांचे काही जुने फोटो दाखवले त्यामध्ये उद्धव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते. त्यातील एका फोटोत उद्धव आणि राज यांच्याबरोबर बाळासाहेब दिसत होते. हे फोटो बघून राज ठाकरे काहीसे भावुक देखील झालेले बघायला मिळाले. आणि त्या फोटोसंदर्भात राज ठाकरे म्हणाले, छान होते ते दिवस. र एका फोटोत दोघं भाऊ एकमेकांसोबत दिसत असून त्यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत आहे. हे फोटो दाखवल्यानंतर त्या दोघांबद्दल अवधूतनं राज यांना विचारलं की, काय वाटतंय सगळं एकत्र असं बघून? तेव्हा राज ठाकरे काही क्षण शांत झालेले दिसत आहेत.

अवधूत गुप्ते यांनी प्रश्नावली सुरवात केली आणि अवधूत याने बारसू मुद्द्याला हात घालून तुमची आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका तर सारखीच आहे, मग तुम्ही अकरा मिळून आंदोलन करायला हरकत नाही असे विचारले असता राज म्हणाले, त्यांचीचूक झाली. तसेच अजित पवारांचा तो व्हिडीओ दाखवून त्यावर राज ठाकरे म्हणाले, राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाचे ते एक नेते आहेत त्यामुळे त्यांना नाही परंतु मी एकट्याच्या जीवावर पक्ष स्थापन करून १३ आमदार निवडून आणेल आहेत. राज ठाकरे यांनी अंदाजित पवार यांच्या मुलाचा नाव घेत त्यांनी स्वतःच्या मुलाला कधी राजकारणात निवडून नाही आणले असा टोला देखील लगावला आहे. ट्रॉलींचे सुद्धा शिकार राज ठाकरे स्वतः झालेले आहेत महेश मांजरेकरांनी किंवाअन्य दिग्दर्शकाला का नाही वाटले तुमच्यावर सिनेमा बनवावा त्यावर राज साहेबानी एक शब्दात सांगितले कि त्याचण्याकडे तसे मटेरिअलच नसेल. एक ट्रॉलर कडून बच्चन स्टाईलमधलं राज ठाकरे कधी बघायला मिळणार अशी विचारणा केली असता, प्रयत्न आणि काम सुरु आहे असे उत्तर त्या ट्रॉलरला दिले. अवधूत कडून गेल्या ४ वर्षात दोन मुख्यमंत्र्यानी शपथ घेतली एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे त्यातील तुम्हला पटणारा आणि बाळासाहेबांच्या मुद्दयाला धरून ठेवणारा कोणता मुख्यमंत्री या तुम्हाला वाटलं यावर राज ठाकरे यांनी सांगितले की , कोणीच नाही कारण बाळासाहेबांना मुख्यमंत्र्यांनी शपथ विधी महत्वाचा नव्हता तर बाळासाहेबांची महाराष्ट्र्राला बलशाली करण्याची आणि महाराष्ट्र्राला जाग येणं हि विचारधारा बाळासाहेबांची महत्वाची होती आणि हेच त्यांचं स्वप्न होता आणि ती या दोघांकडून पूर्ण झालेली नाही . गप्पंकोनासोबत मारायला आवडतात गडकरी कि फडणवीस यावर राज ठाकरे हे फक्त हसले.

हे ही वाचा:

मुंबईकरांसाठी कोस्टल रोडबाबत एकनाथ शिंदेंकडून मोठी अपडेट

साताऱ्यात उदयनराजेंनी स्वतः चालविली दुचाकी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss