Exclusive, २०२३ मध्ये संपेल राज ठाकरे यांचा राजकीय वनवास, मंदार फणसे

२०२२-२३ हे वर्ष ठाकरे कुटूंबासाठी महत्वाचे वर्ष ठरणार आहे. कारण २९ जुन २०२२ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांना त्यांच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते

Exclusive, २०२३ मध्ये संपेल राज ठाकरे यांचा राजकीय वनवास, मंदार फणसे

२०२२-२३ हे वर्ष ठाकरे कुटूंबासाठी महत्वाचे वर्ष ठरणार आहे. कारण २९ जुन २०२२ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांना त्यांच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते आणि कदाचित त्यांचे चूलत भाऊ आणि मावस भाऊ राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा राजकीय संन्यास संपणार की काय हे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच आता सगळ्या राजकीय वर्तुळाच्या नजरा या राज ठाकरे यांच्या सभेकडे लागल्या आहेत. महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा मास लिडर गेले अनेक वर्ष सत्तेच्या सहभागासाठी आणि प्रवेशासाठी धडपडत आहे. या संदर्भामध्ये जेष्ठ राजकीय विश्लेषक मंदार फणसे यांची एक मुलाखत टाईम महाराष्ट्र ने घेतली आहे पाहूया नक्की काय म्हणाले आहेत मंदार फणसे.

मंदार फणसे यांनी राज ठाकरे यांचे राजकारण, त्यांची राजकीय शैली आणि व्यंगचित्रकारिता या सगळ्या गोष्टी जवळुन पहिल्या आहेत. या वर्षीचा राज ठाकरे यांचा राजकीय वनवास हा २०२३ ला संपेल का? त्यावर मंदार फणसे म्हणाले की, भविष्य सांगणे तर कठीण आहे. कारण असे आहे की, राज ठाकरे यांना वेळ कमी मिळाला आहे आणि खास करून जेव्हा निवडणुकीचे राजकारण असेल तेव्हा कारण ज्या पद्धतीने आताचे जे राजकारण चालू आहे. त्यामध्ये पैशाची उलाढाल चालू आहे हा प्रकार आताच्या राजकारणामध्ये चालू असतो. मनसे जशी ५-१० वर्ष आधी उभी होती ती आता उभी आहे की नाही ते दाखवावे लागेल. मनसेच्या जिंकण्याच्या प्रक्रियेला वेळ लागेल परंतु मनसेकडे पुन्हा एकदा खूप मोठी संधी आहे कारण ज्या प्रकाराने राज ठाकरे यांना पाठिंबा मिळत आहे जसे शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांनी राज ठाकरे याना अनुकूलता दाखवली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला बाजूला करण्यासाठी जी काही मोर्चेबांधणीची गरज आहे ती गरज राज ठाकरे यांच्याहून चांगली कोणी करू शकणार नाही असे मंदार फणसे म्हणाले आहेत.

पुढे मंदार फणसे म्हणाले की, “आताच्या घडीला राज ठाकरे हे शिंदे गट आणि भाजप या दोन्ही गटाला अत्यावश्यक आहेत. परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गट्टी होणे गरज नाही. ज्या प्रकारे माविआ एकत्र आले आहेत तर ती साधीसोपी आघाडी नाही, एकत्र आल्यावर ते जो परिणाम साधत आहेत. तो जर तुम्हाला मुंबईमध्ये त्या परिणामाला हादरा द्यायचा असेल तर राज ठाकरे यांच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण अर्थातच राज ठाकरे हे शिवसेनेला मोठ आव्हान देऊ शकतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्याशिवाय शिंदे गटाला आणि भाजपला कोणताही दुसरा पर्याय नाही त्यांना गळा भेट करावीच लागणार आहे. आता सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी साधेपणाने काम करताना दिसत आहेत त्यांना एक आकार देणार एक प्रकारचं व्हिजन मांडणार अस नेतृत्व आसपास असणे गरजेचे आहे. जर राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आले तर विरोधकांसमोर एक आव्हानात्मक त्रिकोण बनेल आणि हा त्रिकोण माविआला सुद्धा खूप जास्त आव्हान निर्माण करेल” असे मंदार फणसे म्हणाले.

पुढे मंदार फणसे म्हणजे की, मला असे वाटते की शिवसेनेची जी आयडेंटिटी तयार झाली आहे. एकीकडे भाषिक अस्मिता होती आणि दुसरीकडे मुंबईच्या दंगली. बाळासाहेबांच्या जवळील शिवसैनिकची अजूनही राज ठाकरे यांची जवळीक आहे. अर्थातच ते ठाकरे या कुटूंबामधून सुद्धा येतात. एका कडेकोट बंदोबस्तामध्ये राज ठाकरे आहेत, एका कोशामध्ये ते बसलेले आहेत आणि ते त्या कोषामधून बाहेर यायला तयार नाहीत. त्यामुळे मनसेचे अतोनात प्रेम करणारे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या पासून दुरावले आहेत. राज ठाकरे यांच्या कडे वेळ खुप कमी आहे परंतु राजकीय दृष्टिकोनाने बघितलं तर त्यांच्याकडे ती रसद त्यांना मिळणार आहे किंवा त्यांनी उभी केली असणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरे यांचा जो औरा आहे आणि त्यांच्या औराच्या अलीकडे लोक येत नाहीत.राजकारणामध्ये संघटन बदलण्याची गरज असते. जसे भाजपचे काही ना काही कार्यक्रम चालू असतात तसे कार्यक्रम मनसेच्या पक्षाला करणे गरजेचे आहेत. ते होत नाही म्हणून त्यांना संघटना बांधण्यासाठी कठीण जात आहे आणि जो पर्यत संघटना होत नाही तोपर्यत करिष्मा शिवाय आणि संघटना शिवाय कोणताही पक्ष पुढे जाऊ शकत नाही.

हे ही वाचा : 

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवत कायम करून वेतन फरक द्या, बाळासाहेब थोरात

शरद पवारांबद्दल मंत्री दादा भुसे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version