Sunday, May 19, 2024

Latest Posts

शरद पवारांबद्दल मंत्री दादा भुसे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत

पन्नास खोके माजलेत बोके... पन्नास खोके, एकदम ओके.. दादा भुसे मुर्दाबाद...दादा भुसे यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय... अशा घोषणा देत राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत जोरदार आंदोलन केले.

पन्नास खोके माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके.. दादा भुसे मुर्दाबाद…दादा भुसे यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय… अशा घोषणा देत राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत जोरदार आंदोलन केले.

आदरणीय शरद पवारसाहेब यांच्याबद्दल शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सभागृहात आक्रमक झाले आणि वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली. खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटवर बोलताना दादा भुसे यांनी संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवाराच्या घरची चाकरी करतात असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दादा भुसे यांनी आदरणीय शरद पवारसाहेबांचे नाव घेण्याची आवश्यकता नव्हती. तुम्ही दिलगिरी व्यक्त करा अशी मागणी केली. दादा भुसे यांनी वक्तव्य केले ते माध्यमांपर्यत गेले आहे त्यामुळे तुम्ही रुलिंग लवकर द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षांकडे केली.दरम्यान शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल तर ते रेकॉर्डवरुन काढण्यात येईल असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिले.

तसेच आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा पंधरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार निदर्शने केली. झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा…ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा घोषणा देत आणि बॅनर फडकवून व हातात गुढी घेऊन महागाई, अवकाळी पाऊस, या विषयावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात हल्लाबोल केला.

हे ही वाचा : 

Readymade Nauvari Saree सह साडीचे Ghgara। Dadar Shopping Market

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी केलेल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंची सरकारकडून अवहेलना, अजित पवार यांचा आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss