Covid 19, चीनमध्ये वाढतोय कोरोनाचा उद्रेक, भारतातील स्थिती घ्या जाणून

चीनमध्ये (China) दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक हा वाढतच चालला आहे. त्याचसोबत कोरोना रुग्णाची (Covid 19) संख्या तर वाढच आहे

Covid 19, चीनमध्ये वाढतोय कोरोनाचा उद्रेक, भारतातील स्थिती घ्या जाणून

Coronavirus Outbreak in China : चीनमध्ये (China) दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक हा वाढतच चालला आहे. त्याचसोबत कोरोना रुग्णाची (Covid 19) संख्या तर वाढच आहे पण त्याचसोबत मृत्यूची संख्या देखील वाढत चालली आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत चीनमध्ये जवळपास ४० टक्के नागरिकांना हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच चीनमधील बहुतेक शहरांमध्ये ५० टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा हा आकडा आता दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

चीन बरोबर जगात देखील कोरोनोचा धोका हा वाढत चालला आहे. त्यामुळे भारताने देखील आता खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. भारतातील प्रत्येक विमानतळावर कोविड निगेटिव्ह अहवाल सादर करणे अनिवार्य आहे. आणि प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग तसेच रँडम कोविड चाचणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर चीन, थायलंडसह सहा देशातील प्रवाशी जर भारतात येत असतील तर त्यांना आरटीपीसीआर चाचणी देखील बंधनकारक आहे. संपूर्ण भारतात २४ डिसेंबर पासून आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉनचे ११ सब व्हेरियंट सापडले आहे. तर एकूण १२४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.

अमेरिका आणि चीन (America and China) या दोन देशांमध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटमुळे रुग्ण संख्या हि झपाट्याने वाढत आहे. भारतामध्ये ओमायक्रॉनच्या बी.एफ.7 व्हेरियंटचे (B.F.7 Variant) पाच रुग्ण तर एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे (XBB 1.5 Variant) पाच रुग्ण आता पर्यंत आढळले आहेत. तसेच भारतात कोरोनाचे रुग्ण जरी वाढत असले तरी परिस्थिती हि दिलासादायक आहे. देशात गुरुवारी १८८ नवे रुग्ण आढळले होते. तर सक्रिय रुग्णांची नोंद हि २,५५४ झाली होती.

हे ही वाचा:

एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने वृद्ध महिलेवर केला लघवी, एअरलाईनने केली कडक कारवाई

‘एव्हरग्रीन मित्रा’ ने पाकिस्तानला फसवले, चीनमधून आयात केलेल्या रेल्वेच्या बोगींमुळे पाकिस्तान नाराज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version