Elon Musk ने दिला X युजर्संना धक्का, आता युजर्सना मोजावे लागणार पैसे !

सर्वात मोठा बदल म्हणजे ट्विटर चे नाव बदलून X करणे. पण एलॉन यांनी युजर्संना मोठा धक्का दिला आहे. आता नवीन X युजर्संना पोस्ट लाईक, कंमेंट,आणि शेअर करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

Elon Musk ने दिला X युजर्संना धक्का, आता युजर्सना मोजावे लागणार पैसे !

काही दिवसांपूर्वी ट्विटर म्हणजे आत्ताच्या ‘X’ ची मालकी एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आली. एलॉन यांच्याकडे अधिकृत मालकी आल्यापासून त्यांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये अनेक बदल केले. त्यातला सर्वात मोठा बदल म्हणजे ट्विटरचे (Twitter) नाव बदलून ‘X’ करणे. पण आता, एलॉन यांनी युजर्संना मोठा धक्का दिला आहे. नवीन ‘X’ युजर्संना पोस्ट लाईक, कंमेंट आणि शेअर करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. एलॉन मस्क यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे कि, ‘जे कोणी नवीन युजर्स असतील त्यांना पोस्ट लिहण्यासाठी, शेअर करण्यासाठी आणि लाईक आणि कंमेंट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. कोणतेही ट्विट बुकमार्क करणे किंवा ट्विटला उत्तर देणे यासाठी देखील पैसे मोजावे लागतील.’ हि बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्समध्ये मात्र नाराजी दिसून येत आहे.

‘X’ वर पोस्ट करण्यासाठी शुल्क आकारण्याची योजना सर्वप्रथम न्यूझिलंड (New Zealand) आणि फिलिपिन्स (Philippines) मध्ये चाचणी म्हणून करण्यात आली होती. हि योजना यशस्वी झाली म्हणून युजर्संनी एलॉन मस्कच्या या निर्णयाचं कौतुक करत आवश्यक तेवढी रक्कम हि भरली. याचसोबत शुल्क आकारले जाणार असल्यामुळे बनावट खात्यांपासून हि सुटका मिळेल असे त्यांनी सांगितले.

याचबरोबर मस्क यांनी सांगितलं, ‘एक्स मीडिया वापरण्यासाठी युजर्संनी एकदा वर्षभरासाठीचे पैसे भरले तर ते मोकळे होतील पुन्हापुन्हा त्यांना पैसे भरावे लागणार नाही आणि पैसे आकारले असल्यामुळे फेक खाती बनवणारी लोकही यापासून दूर राहतील.’ तरी हा निर्णय किती जणांना पसंत पडला आणि किती जणांना नाही याचे कोडे अजून उलगडले नाही.

हे ही वाचा:

मतांसाठी श्रीरामाचा गैरवापर, Nitin Gadkari यांची उमेदवारी रद्द करा, Congress चे Atul Londhe यांची मागणी

AAMIR KHAN ही झाला डिपफेकचा शिकार, पोलिसांकडे घेतली धाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version